[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
नवी दिल्ली: संसदेच्या सुरक्षेवर चर्चा करण्याची मागणी करणाऱ्या विरोधी पक्षांच्या एकूण 141 खासदारांनी निलंबित करण्यात आल्यानंतर केंद्र सरकारवर जोरदार टीका सुरू झाली. मात्र इतक्या मोठ्या संख्येने खासदार निलंबित झाल्यानंतर त्यातील तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी (Kalyan Banerjee) यांची मात्र चर्चा सुरू झाली. खासदार कल्याण बॅनर्जी यांनी संसदेच्या पायऱ्यांवर राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांची नक्कल करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कल्याण बॅनर्जी यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
बॅनर्जी यांनी ही मिमिक्री अशा वेळी केली जेव्हा विरोधी पक्षाचे खासदार निलंबनाच्या विरोधात संसद भवनाबाहेर निदर्शने करत होते. कल्याण बॅनर्जी त्यांच्या शैलीत जयदीप धनखड (Kalyan Banerjee Mimicry Viral Video) यांची नक्कल करत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. राहुल गांधी उभे राहून बॅनर्जींच्या या मिमिक्रीचा व्हिडीओ बनवत असल्याने याचीही चर्चा होत आहे. राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांची नक्कल करणारे कल्याण बॅनर्जी नेमके कोण हे जाणून घेऊया.
#WATCH | TMC MP Kalyan Banerjee mimics Rajya Sabha Chairman Jagdeep Dhankhar in Parliament premises pic.twitter.com/naabLIzibY
— ANI (@ANI) December 19, 2023
वकील ते राजकारण असा प्रवास (Who Is Kalyan Banerjee)
बंगालच्या राजकारणात सक्रिय असलेले कल्याण बॅनर्जी हे ममता बॅनर्जी यांच्या टीएमसी पक्षाचे आहेत. त्यांचा जन्म आसनसोल येथे झाला. बॅनर्जी यांनी बी.कॉम केल्यानंतर एलएलबीचे शिक्षण घेतले. त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण बांकुरा समिलानी कॉलेजमधून केले, तर रांची लॉ कॉलेजमधून एलएलबी केले.
बॅनर्जी यांचे वडील भोलानाथ बॅनर्जी आणि आई सिबानी बॅनर्जी यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या पत्नीचे नाव छबी बॅनर्जी असून त्यांना दोन मुले आहेत. कल्याण बॅनर्जी हे पश्चिम बंगालमधील बड्या वकिलांमध्ये गणले जातात आणि ते मुख्यतः तृणमूल काँग्रेसचे खटले लढतात. बॅनर्जी 1981 पासून कलकत्ता उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करत आहेत.
सेरामपूर लोकसभा मतदारसंघातून खासदार
कल्याण बॅनर्जी हे सेरामपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून खासदार झाले आहेत. 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांनी टीएमसीच्या तिकिटावर विजय मिळवला. त्यानंतर 2019 मध्ये त्यांनी पुन्हा निवडणूक जिंकली.
दरम्यान, कल्याण बॅनर्जी यांनी केलेल्या मिमिक्रीवर राज्यसभा सभापती जयदीप धनखड यांनी नाराजी व्यक्त केली आहे. संसदेच्या जेष्ठ सदस्यांनी अशा प्रकारचे वर्तन करणं हे शोभत नाही असं त्यांनी म्हटलंय.
#WATCH | “Ridiculous, unacceptable”, says Jagdeep Dhankhar after TMC MP Kalyan Banerjee mimics Rajya Sabha Chairman and Congress MP Rahul Gandhi films the act. pic.twitter.com/F3rftvDmhJ
— ANI (@ANI) December 19, 2023
ही बातमी वाचा:
[ad_2]