Google Maps New Feature Is Coming Helpful For Reduce Cost Of Petrol Diesel Detail Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी जाण्यासाठी तुम्ही सर्वांनी Google Maps वापरत असाल. आता या अॅपमध्ये अनेक नवीन फीचर्स आणले जातायत. ज्यामुळे तुम्हाला एक नवा अनुभव देखील मिळण्यास मदत होणार आहे. यामुळे पैसा आणि वेळही वाचणार असल्याचं सांगण्यात येतंय. गुगल नवीन वर्षापासून या अॅपमध्ये ‘फ्युएल एफिशियंट रूटिंग’ फीचर आणत आहे. मात्र, त्यावेळी ते फक्त अमेरिका, कॅनडा आणि इतर देशांपुरतेच मर्यादित होते. आता गुगल नवीन वर्षापासून भारतातही हे फीचर देणार आहे.

पर्यावरण वाचवण्यासही होईल मदत

या फीचरचा फायदा दुचाकी आणि चारचाकीने प्रवास करणाऱ्या लोकांना होणार असून त्यांचा पैसा आणि वेळ दोन्ही वाचणार आहे. जर तुम्ही विचार करत असाल तर प्रत्यक्षात या फीचरच्या मदतीने कंपनी तुम्हाला असा मार्ग सांगेल ज्यात तुमच्या गंतव्यस्थानापर्यंत पोहोचण्यासाठी कमी रहदारी असेल आणि तुमच्या वाहनाच्या इंजिननुसार कोणता मार्ग सर्वोत्तम आहे हे गूगल मॅप तुम्हाला सांगेल. एआयच्या मदतीने कंपनी तुम्हाला रस्त्याच्या उंची आणि रहदारीनुसार सर्वोत्तम मार्ग सांगेल. कंपनीने सांगितले की या वैशिष्ट्याच्या मदतीने आतापर्यंत 2.4 दशलक्ष मेट्रिक टन कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन कमी केले आहे.

‘हे’ फीचर अज्ञात लोकेशन्स समजण्यास करेल मदत

अज्ञात लोकेशन्स समजून घेण्यासाठी कंपनी Google Map मध्ये ‘Address Description’ फीचर जोडत आहे. या फीचर अंतर्गत, जेव्हा कोणी तुमच्यासोबत एखादे लोकेशन शेअर करते, तेव्हा कंपनी तुम्हाला त्या ठिकाणाभोवती 5 लँडमार्क आणि प्रसिद्ध ठिकाणे दाखवेल जेणेकरून तुम्ही तुमच्या गंतव्यस्थानावर सहज पोहोचू शकाल. नवीन वर्षापासून लोकांनाही हे फीचर मिळण्यास सुरुवात होईल.

नव्या वर्षात मिळणार नवे अपडेट

Google चे हे अपडेट लवकरच Android आणि iOS वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होणार आहे. गुगलचे हे मॅप अपडेट पुढील वर्षी लॉन्च होण्याची शक्यता आहे. जिओफेन्स वॉरंटच्या वाढत्या गैरवापरामुळे असा बदल करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती.जगभरातील अधिकारी जिओफेन्स वॉरंटद्वारे लोकांच्या प्रायव्हसीमध्ये हस्तक्षेप कर आहेत, त्यामुळे ही मागणी वारंवार केली जात होती. गुगलने अखेर याची अंमलबजावणी केली आहे.

निवडक लोकेशन करता येणार डिलीट

याशिवाय गुगलच्या मॅप्स सेवेतील आणखी एक मोठा बदल म्हणजे निवडक डेटा डिलीट करण्याची सुविधा. आता गुगल आपल्या वापरकर्त्यांना विशिष्ट स्थानाशी संबंधित इतिहास हटविण्याची सुविधा देखील देईल. गुगल आधीच लोकेशन सक्षम-अक्षम करण्याची सुविधा देत आहे. आता वापरकर्ते लोकेशन सर्व्हिस चालू ठेवल्यानंतरही ती पूर्णपणे नियंत्रित करू शकतील. हे वापरकर्त्यावर अवलंबून असेल की त्याला त्याचा डेटा किती प्रमाणात साठवायचा आहे.

[ad_2]

Related posts