BJP And Shinde Group Will Contest Elections In Alliance Discussion With Amit Shah Sanjay Shirsat Criticism On Jitendra Awhad

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

छत्रपती संभाजीनगर : आगामी निवडणुका (Elections) आम्ही भाजपसोबत (BJP) युतीत लढणार असून, त्या धनुष्यबाणावरच लढल्या जाणार असल्याचे स्पष्ट संवाद भाजप नेते अमित शाह (Amit Shah) यांच्यासोबत झाला असल्याचा दावा शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केला आहे. त्यामुळे शिंदे गटाचे नेते कमळावर निवडणूक लढवण्याचा प्रश्नच येत नाही असेही शिरसाट म्हणाले आहे. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना शिरसाट बोलत होते.

आगामी निवडणुका भाजप एकट्याने लढवणार असून, ज्यांना भाजपसोबत निवडणुका लढवायची आहे त्यांनी कमळावर निवडणूक लढवण्याचे भाजप आणि आरआरएसच्या बैठकीत ठरले असल्याचा दावा शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, यालाच उत्तर देतांना शिंदे गटाचे आमदार तथा प्रवक्ते संजय शिरसाट यांनी, “आगामी निवडणुका आम्ही धनुष्यबाणावरच लढवणार असल्याचे म्हटले आहे. सोबतच भाजपसोबत युतीत शिवसेना (शिंदे गट) निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्टपणे बातचीत अमित शाह यांच्यासोबत झाल्याचं” देखील शिरसाट म्हणाले. 

पक्ष संपतोय, त्याकडे आधी लक्ष द्यावे…

दरम्यान याचवेळी आव्हाड यांच्यावर टीका करतांना शिरसाट म्हणाले की, “राजकारणात भविष्य पाहणारे लोकांची संख्या जास्त झाली आहे. तुम्ही अनेकवेळा पक्षाशी गद्दारी केली आहे. त्यामुळे आता तुम्ही आम्हाला शिकवू नयेत. तुम्हाला आता आतल्या मीटिंगमध्ये मुद्दे देखील कळत असेल तर तुमचं कठीण आहे. तुम्ही कुठेही कान लावू नका, तुमच्या पक्षाचे अस्तित्व संपले आहे, तिकडे आधी बघा नंतर दुसरीकडे बघा,” असा खोचक टोलाही शिरसाट यांनी आव्हाडांना लगावला.

निकाल आमच्याच बाजूने…

आम्हाला अपात्र किंवा पात्रताबाबत चिंता नाही. इतिहास पाहिला तर या आधी सर्व बाबींमध्ये अधिकृत पक्ष म्हणून आम्हालाच मान्यता मिळाली आहे आणि चिन्ह देखील मिळाले आहे. आत्ता झालेल्या सुनावणीत आम्ही सगळे पुरावे दिले आहेत. त्यामुळे 10 जानेवारी रोजी येणारा निर्णय आमच्याच बाजूने लागेल असा आम्हाला विश्वास असल्याचे शिरसाट म्हणाले आहे.

उद्धव ठाकरेंवर टीका…

उद्धव ठाकरे यांनी हिवाळी अधिवेशनात हजेरी लावली होती. दरम्यान, यावरून देखील शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. फक्त यायचं, बसायचं, जेवायचं, चहा घ्यायचं इतकच काम उद्धव ठाकरे यांनी नागपुरात केले. त्याऐवजी काही चांगले बोलले असते तर बरं झालं असते. त्यामुळे दर्शनापुरते आले आणि गेले इतकच काम उद्धव ठाकरे यांनी नागपूर अधिवेशनात केल्याचं शिरसाट म्हणाले.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Jitendra Awhad on Ajit Pawar: अजित पवार मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल, पण… : जितेंद्र आव्हाड

[ad_2]

Related posts