Pune Crime News Hadapsar Police Procession Koyta Gang

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pune Crime News : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेय. कोयता गँगने दहशत माजवली होती. पुण्यात गाड्यांची तोडफोड करणारी एक टोळी सक्रीय होती. त्यांना पुणे पोलिसांनी चांगलाच धड शिकवलाय. जिथे गुन्हा केला, त्याच ठिकाणी गुन्हेगारांची धिंड काढत धडा शिकवलाय. पुण्यातील हडपसर भागामध्ये गाड्यांची तोडफोड करणाऱ्या गुन्हेगारांची पोलिसांनी धिंड काढली. 

पुण्यातील हडपसर परिसरात गाड्यांची तोडफोड करत दहशत माजवणाऱ्या  चार जणांच्या टोळक्याची हडपसर पोलिसांनी धिंड काढली. ज्या परिसरात टोळक्यांनी गाड्यांची तोडफोड केली होती, तिथेच पोलिसांनी गुन्हेगारांना शिक्षा दिली. त्या सात ते आठ जणांची धिंड काढली. काही दिवसांपूर्वीच आरोपींनीहडपसर भागात सत ते आठ गाड्यांची आणि परिसरातील दुकानांची तोडफोड करण्यात आली होती. यामध्ये नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. हडपसर येथील स्थानिकांनी याप्रकरणी पोलिसांमध्ये धाव घेतली होती. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत गाडी तोडफोड प्रकरणी चारही आरोपींना हडपसर पोलिसांकडून अटक करण्यात आले.  पुण्यात गुन्हेगारांवर पोलीसांची वचक रहावी म्हणून अनेक वेळा धिंड काढण्यात येते, मात्र या गुडांकडून सर्वसामान्याचे नुकसान होते त्याचे काय?  वाहणांची तोडफोड करण्यात येते याची कोण भरपाई देणार? फक्त धिंड काढून प्रश्न सुटणार का? असा सवाल उपस्थित होतोय. पण पुणे पोलिसांनी केलेल्या य कारवाईलाही तितकाच चांगल प्रतिसाद मिळतोय. 

पुण्यातील हडपसर भागात पोलिसांकडून गुन्हेगारांची धिंड काढण्यात आली, याची चर्चा हडपसर परिसरात सुरु आहे. त्या आरोपींनी हडपसर परिसरात गाड्यांची तोडफोड करत दहशत माजवली होती. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर कारवाईच बडगा उचलला. ज्या परिसरात गाड्यांची तोडफोड केली, तिथेच पोलिसांनी गुन्हेगारांना शिक्षा दिली. 
काही दिवसांपूर्वीच आरोपींकडून हडपसर भागात 7 ते 8 गाड्यांची आणि  परिसरातील दुकानांची तोडफोड करण्यात आली होती. गाडी तोडफोड प्रकरणी चारही आरोपींना हडपसर पोलिसांकडून अटक करण्यात आली. त्यानंतर त्या आरोपींची हडपसर भागत धिंड काढून धडा शिकवला. 
 
दरम्यान, याआधीही पुणे पोलिसांनी आरोपींची धिंड काढत धडा शिकवलाय. मागील काही दिवसांपूर्वी पुण्यातील सिंहगड रस्त्यावर असलेल्या एका हॉटेलची तोडफोड करुन लूटमार करण्याची घटना घडली होती. याप्रकरणी  वैभव इक्कर या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी तात्काळ अटक केली. दरम्यान हा गुन्हेगार परिसरात दहशतही माजवत होता. आणि त्याची हीच दहशत कमी करण्यासाठी पुणे पोलिसांनी त्याची याच ठिकाणी धुलाई करत धिंड काढली होती. तसंच या गुंडाच्या त्रासाला कंटाळलेल्या नागरिकांनी पोलिसांचं कौतुक केलं होतं.  

[ad_2]

Related posts