[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Nashik Child Trafficking : नाशिकच्या (Nashik) मनमाड आणि भुसावळ रेल्वे स्थानकावर (Bhusawal Railway Station) 59 बालकांची सुटका करण्यात आल्यानंतर आता बालके पालकांच्या ताब्यात देण्याबाबतचा मुद्दा समोर आला आहे. मात्र कायदेशीर बाबींनुसार ही बालके थेट पालकांना न देता त्यांचा ताबा बिहारमधील बालकल्याण समितीच्या स्वाधीन करुन त्यांच्यामार्फत पालकांची आर्थिक सक्षमता तपासूनच त्यांना सुपूर्द करण्यात येतील. यासाठी रेल्वे पोलिसांना आदेश देण्यात आले आहेत. त्यांच्याकडून आवश्यक बंदोबस्त प्राप्त झाल्यावर कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती समोर आली आहे.
बिहारमधून (Bihar) रेल्वेने अल्पवयीन बालकांची तस्करी करणाऱ्या टोळीस रेल्वे पोलिसांनी (Railway Police) अटक करत 59 बालकांची सुखरुप सुटका केल्यानंतर 30 बालकांना नाशिकच्या बालगृहात ठेवले आहे. सहा दिवसानंतर या बालकांमधील आठ-जणांच्या पालकांनी सोमवारी बालकांची भेट घेतली. विशेष म्हणजे, या पालकांनी बालगृह न्यायालयाकडे त्यांचा ताबा मिळण्यासाठी विनंती केली असता रेल्वे पोलिसांमार्फत त्यांची रवानगी बिहारच्या बालकल्याण समितीकडे करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानंतर संबंधित पालकांची ओळख परेड केल्यानंतर बालकांचा ताबा पालकांकडे देण्यात येणार असल्याचे जिल्हा बाळ कल्याण समितीकडून सांगण्यात आले आहे.
जळगाव रेल्वे प्रशासनाला मिळालेल्या माहितीच्या आधारे मनमाड आणि भुसावळ रेल्वे स्थानकात रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलिसांच्या संयुक्त पथकाने ऑपरेशन आहट अंतर्गत संयुक्त कारवाई करत 30 मे रोजी रात्री वेळी धावत्या प्रवासी रेल्वे गाडीतून 8 ते 15 वयोगटातील मुलांची सुटका केली होती. पोलिसांच्या तपासणीत कोणतीही कागदपत्रे नसताना या मुलांना सांगली (Sangli) येथे मदरशात शिक्षण देण्याच्या नावाखाली घेऊन जाणाऱ्या पाच संशयितांविरोधात मनमाड लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. लोहमार्ग पोलिसांनी वैद्यकीय तपासणी करुन नाशिकसह जळगावच्या बालगृहात रवानगी केली. प्राथमिक माहितीद्वारे रेल्वे पोलिसांनी मानवी तस्करी अंतर्गत गुन्हा दाखल केला. पुणे आणि सांगली जिल्ह्यातील मदरशामध्ये या मुलांना नेले जात असल्याची माहिती देण्यात आली.
पालकांची सक्षमता पडताळून ताबा
सद्यस्थितीत जिल्हा महिला बालकल्याण समितीच्या बालगृहात या बालकांना ठेवण्यात आले आहे. त्यांची सर्वोतपरी काळजी घेतली जात आहे. बिहारवरुन काही पालक मुलांच्या भेटीसाठी जळगावमध्ये आले होते. त्यानंतर पालकांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत बालकांचा ताबा देण्याची मागणी बालकल्याण समिती सदस्य व न्यायपीठाकडे केली. मात्र, कायदेशीर बाबींनुसार हे बालके थेट पालकांना न देता त्यांचा ताबा बिहारमधील बालकल्याण समितीच्या स्वाधीन करुन त्यांच्यामार्फत पालकांची आर्थिक सक्षमता तपासूनच त्यांना सुपूर्द करण्यात येईल. यासाठी रेल्वे पोलिसांना आदेश देण्यात आले आहेत. त्यांच्याकडून आवश्यक बंदोबस्त प्राप्त झाल्यावर कार्यवाही करण्यात येईल.
ताबा पालकांकडे देणार, पण…
जिल्हा बालकल्याण समितीच्या माध्यमातून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याचे काम सुरु आहे. त्याचबरोबर पालकांनी संबंधित बालकांची भेट झाली आहे. मात्र बालकांचा पालकांकडे ताबा देण्यास नकार देण्यात आला आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित बालकांना बिहारमध्ये पाठवण्यात येणार आहे. याबाबतची चर्चा बिहारमधील बालकल्याण समितीशी होत असून स्थानिक सरपंच, पोलीस पाटील यांच्यामार्फत पालकांची ओळख परेड करुन बालकांचा ताबा देण्यात येणार आहे.
[ad_2]