Manoj Jarange Meet Maharashtra Government Committee Discuss On Jarange Demand On Maratha Reservation ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Manoj Jarange : जमत नसेल तर तुमचा आमचा रस्ता मोकळा, मनोज जरांगे त्यांच्या मागणीवर ठाम सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला, 

जालना: सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या भेटीसाठी आंतरवाली सराटीमध्ये (Antarwali Sarathi) दाखल झालं आहे. मंत्री उदय सामंत, गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांचं या शिष्टमंडळात सहभाग पाहायला मिळतोय. सोबतच जालन्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक हे देखील यावेळी उपस्थित असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, सरसकटला पर्याय म्हणून रक्तसंबंधातील  सगेसोयरे असे आपले ठरले होते. त्यानुसार निर्णय घ्यावा आणि वडिलांच्या वेतरिक्त मामा, आत्या यांना देखील लाभ मिळावा, अशी मागणी जरांगे यांनी केली आहे. तसेच, असे न झाल्यास आपलं जमणार नसल्याचा इशारा देखील जरांगे यांनी दिला आहे. 

दरम्यान यावेळी बोलतांना जरांगे म्हणाले की, ” रक्ताच्या नातेवाईकांना प्रमाणपत्र देण्याचे ठरले होते, त्यानुसार सगेसोयरे म्हणजे काय? हे स्पष्ट करा अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. तर, वडिलांच्या वेतरिक्त मामा, आत्या यांना देखील लाभ मिळावा. सरसकटला पर्याय म्हणून रक्तसंबंधातील सगेसोयरे असे आपले ठरले होते. नोंदी असलेल्या सबंधीत नातेवाईकांना आणि सर्व रक्तातील सगेसोयरे यांना हे प्रमाणपत्र मिळावे. रक्ताचे सगेसोयरे हा शब्द आपण गृहीत धरला होता. माझ्या मामाला किंवा मावशी यांना देखील प्रमाणपत्र मिळावे.  जर समजा माझ्याकडे प्रमाणपत्र असेल तर माझ्या पत्नीला याचा लाभ मिळणार नाही का? असा सवाल जरांगे यांनी उपस्थित केला आहे. 

[ad_2]

Related posts