Private Picture Can Leak Delete Video Editig Apps From Smartphone Know Details

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Mobile Apps :  स्मार्टफोन वापरत असाल तर अनेक खबरदारी घ्यावी लागते. एका चुकीमुळे तुम्हाला मोठं नुकसान सहन करावं लागू शकतं. त्यामुळे तुम्ही मोबाईलमध्ये काहीही करताना  सतर्क राहावं. आम्ही तुम्हाला अशा काही अॅप्सबद्दल सांगणार आहोत जे तुमच्यासाठी खूप हानिकारक ठरतात. या अॅप्सच्या मदतीने युजर्सच्या प्रायव्हेट फोटोसोबत इतर माहितीही लीक होऊ शकते. चला तर मग समजून घेऊया-

काही काळापूर्वी मेटाने एक सर्व्हे केला होता आणि असे अनेक अॅप्स आहेत जे युजर्सची वैयक्तिक माहिती लीक करत असल्याचे आढळून आले होते. युजर्सचे खासगी फोटोही लीक होत आहेत. त्यामुळे तुम्ही सतर्क राहिलं पाहिजे. फोटो क्लिक करताना फोनमध्ये एडिटिंग अॅप्स आहेत की नाही हे  पाहा, असं मेटाने सांगितलं होतं. हे अॅप्स धोकादायक असल्याचंदेखील त्यांनी सांगितलं होतं त्यामुळे कोणत्याही प्रकारचं इडिटींग अॅप डाऊनलोड करु नका. 

Video आणि  Photo इडिटिंग अॅप्स डाऊनलोड करु नका

सध्या सोशल मीडियावर व्हिडीओ आणि रिल्स तयार करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे अॅप्स वापरत असतो. गुगलदेखील आपल्याला अॅप्स सजेस्ट करत असतात. आपण ते पाहून अनेकदा त्या अॅप्स डाऊनलोड करत असतो आणि क्रिएटीव्ह व्हिडीओ एडिट करण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र हेच क्रिएटीव्ह व्हिडीओ एडिट करताना आपण आपल्या फोटो अॅपचे किंवा गॅलरीचे अॅक्सेस देत असतो.  मात्र हेच अॅप्स सगळे अॅक्सेस घेऊन आपला डेटा चोरू शकतात. त्यामुळे कोणतंही Video आणि  Photo इडिटिंग अॅप्स डाऊनलोड करताना नक्की काळजी घ्या. नाही तर तुमचा खासगी डेटा लीक होण्याची दाट शक्यता आहे. 

गुगलने हटवल्या अॅप्स

गुगलनेही काही दिवसांपूर्वी सरकारच्या तक्रारीवर कारवाई करत काही अ ॅप्स डिलीट केले आहेत. म्हणजेच प्ले स्टोअरवरून तुम्ही ते अॅप्स डाऊनलोड करू शकणार नाही. अशी कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ नाही. सायबर गुन्हे रोखण्यासाठी टेक जायंट गुगल अनेकदा असे निर्णय घेते. यापूर्वी अनेकदा अशी कारवाई करण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याबाबत माहिती दिली होती. गुगलकडून कारवाई करून या अॅप्सवर बंदी घालण्यात आल्याचे त्यांनी सांगितले होते. खरे तर हे लोन अ ॅप्स होते जे ग्राहकांना आमिष दाखवत होते आणि नंतर त्यांचा वापर करून त्यांना ब्लॅकमेल करत होते. अशा वेळी तुम्हाला खूप सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. 

इतर महत्वाची बातमी 

PAN AADHAAR Link : नागरिकांकडून आधार-पॅन लिंकची दिरंगाई; सरकारने वसूल केला 2100 कोटींचा दंड

[ad_2]

Related posts