coronavirus jn1 sub variant cases in india statewise list covid19

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Covid 19 JN.1 : देशात गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ होताना दिसेतय. ओमीक्रॉन व्हेरिएंटच्या नवा सब व्हेरिएंट JN.1 यासाठी जबाबदार असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या चोवीस तासात देशात कोरोनाच्या नव्या 640 रुग्णांची नोंद (Corona New Patient) झाली आहे. देशात सध्या कोरोनाची सक्रीय रुग्णसंख्या (Active Patient) 2997 इतकी झाली आहे. धक्कादायक म्हणजे केरळात (Kerala) गेल्या 24 तासात कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला. तर देशभरात गुरुवारी कोरोनामुळे सहा रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गेल्या सात महिन्यात कोरोनामुळे मृत्यू झालेला हा सर्वात मोठा आकडा आहे. 

भारतात आतापर्यंत कोरोना संक्रमित प्रकरणं 4.5 कोटीहून अधिक (4,50,07,212) आहेत. यातले 4,44,70,887 पूर्ण पणे बरे झालेत. त्यामुळे रिकव्हरी रेट 98.81 टक्के इतका आहे. तर देशात कोरोनामुळे मृत्यू झाल्यांची संख्या  5,33,328 इतकी झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार देशात 220.67 कोटी लोकांचं लसीकरण झालं आहे. 

केरळात 265 नवे रुग्ण, 1 रुग्णाचा मृत्यू
देशताली एकूण रुग्णसंख्येपैकी सर्वाधिक रुग्ण हे एकट्या केरळ राज्यात आहेत. गेल्या चोवीस तासात केरळात सर्वाधिक 265 रुग्णांची नोंद झाली आहे. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला. केरळात कोरोनाच्या सक्रिया रुग्णांची संख्या 2,606 इतकी आहे. केरळात गेल्या तीन वर्षात कोरोनामुळे 72,060 जणांचा मृत्यू झाला. 

कोणत्या राज्यात किती रुग्ण पाहा
महाराष्ट्र : नवे रुग्ण – 8, सक्रिय रुग्ण – 53
केरळ : नवे रुग्ण – 265, सक्रिय रुग्ण -2606
कर्नाटक : नवे रुग्ण – 8, सक्रिय रुग्ण – 53
तामिळनाडू : नवे रुग्ण – 15, सक्रिय रुग्ण – 104
दिल्ली : नवे रुग्ण – 13, सक्रिय रुग्ण – 105
आंध्रप्रदेश : नवे रुग्ण – 3, सक्रिय रुग्ण – 4
आसाम : नवे रुग्ण – 0, सक्रिय रुग्ण – 1
बिहार : नवे रुग्ण – 2, सक्रिय रुग्ण – 2
गोवा : नवे रुग्ण – 0, सक्रिय रुग्ण – 16

महाराष्ट्र सरकार अलर्ट
राज्यातल्या कोरोना संकटामुळे आरोग्य खातं अॅक्शनमोडवर आलंय. आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेबाबात सर्व जिल्ह्यांमधल्या आरोग्य अधिका-यांशी ऑनलाईन चर्चा केली. यात लशी, रुग्णालयातले बेड्स, ऑक्सिजन बेड आणि औषधांच्या साठ्याबाबत आढावा घेण्यात आला. जेएन-१ व्हेरियंट सौम्य आहे. मात्र तरीही लवकरच टास्क फोर्स तयार करण्यात येणार असल्याची माहिती सावंत यांनी दिली. नागरिकांनी घाबरून न जाता कोविड अनुरूप वर्तणुकीचे काटेकोर पालन करावे, असं आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी केलं आहे. 

संशयित रुग्णांच्या चाचण्या वाढविण्याचे, त्यांचे सर्वेक्षण अधिक सक्षम करण्याचे आणि त्यांच्यावर आवश्यक ते उपचार करावेत. त्याचप्रमाणे जिल्हा स्तरावर रुग्णालयांतील यंत्रणेचे गांभीर्याने मॉकड्रिल करून तीन दिवसांत याविषयीचा अहवाल सादर करावा, असे निर्देशही डॉ. सावंत यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत.

Related posts