( प्रगत भारत । pragatbharat.com)
Shash Mahapurush Rajyog: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, 2024 मध्ये, कर्म दाता शनिदेव त्यांच्या मूळ त्रिकोण राशी कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. ज्यामुळे शश महापुरुष राजयोग निर्माण होणार आहे. हा राजयोग ज्योतिषशास्त्रात अत्यंत शुभ मानला जातो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत हा राजयोग तयार होतो त्यांचं नशीब उजळू लागतं.
अशा परिस्थितीत या राजयोगाच्या प्रभावामुळे 2024 मध्ये 3 राशीच्या लोकांचं नशीब चमकण्याची शक्यता आहे. या राशींसाठी आर्थिक लाभ आणि सौभाग्य मिळण्याची दाट शक्यता आहे. जाणून घेऊया शश महापुरुष राजयोगाच्या निर्मितीमुळे कोणत्या व्यक्तींच्या आयुष्यात चांगले दिवस येणार आहेत.
कुंभ रास (Kumbh Zodiac)
तुमच्या राशीनुसार चढत्या घरात शश महापुरुष राजयोग तयार होणार आहे. यावेळी तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. शनिदेव तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये भरीव प्रगती करतील. तुम्हाला आर्थिक फायदा होऊ शकतो. तुमच्या आत एक नवीन ऊर्जा संचारेल. यावेळी तुमचे वैवाहिक जीवन आनंदी असेल. तसेच अविवाहित लोक लग्न करू शकतात.
वृषभ रास (Taurus Zodiac)
या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात चांगले यश मिळू शकते. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी हे वर्ष खूप चांगले ठरणार आहे. परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. जे नोकरीच्या शोधात आहेत त्यांना नोकरी मिळू शकणार आहे. तांत्रिक क्षेत्राशी निगडित लोकांसाठी हा काळ खूप चांगला असणार आहे.
सिंह रास (Leo Zodiac)
शश महापुरुष राजयोगाच्या निर्मितीने तुम्हा लोकांसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. हा राजयोग तुमच्या राशीतून सप्तम भावात तयार होणार आहे. तुमचे वैवाहिक जीवन चांगलं होणार आहे. तुम्ही काम-व्यवसायाशी संबंधित कारणांसाठी देश-विदेशात प्रवास करू शकता. भागीदारीचे काम करणाऱ्यांना चांगला आर्थिक लाभ मिळू शकतो. या काळात तुमच्या आर्थिक स्थितीत अचानक वाढ होऊ शकते.
( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )