Hasan Mushrif Slams Jitendra Awhad On Mahayuti Alliance Maharashtra News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

कोल्हापूर:  भाजप (BJP)  आणि शिंदेंसोबत जाण्यासाठी जितेंद्र आव्हाडांचा (Jitendra Awhad)  पुढाकार होता, असा गौप्यस्फोट वैद्यकीय शिक्षण मंत्री  हसन मुश्रीफांनी केला आहे. तर आव्हाडांना पक्षात कोणीही विचारत नाही, अशी टीका देखील मुश्रीफांनी यावेळी केली आहे.  ते कोल्हापुरात माध्यमांशी होते. एकाकी पडल्यामुळे आव्हाड भ्रमिष्ट झाल्याचे देखील वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif ) म्हणाले. 

मंत्री हसन मुश्रीफांनी  जितेंद्र आव्हाडांवर गंभीर आरोप केले आहेत. आरोप करताना मुश्रीफांनी जितेंद्र आव्हाडांवर एकेरी शब्दात हल्लाबोल केला आहे.  यालाच सगळं कळतय का? असे म्हणत एकेरी शब्दात टीका केली आहे. मुश्रीफ  आव्हाड म्हणाले,  जितेंद्र आव्हाडांना पक्षात कोणी विचारत नाहीत. एकाकी पडल्यामुळे ते भ्रमिष्ट अवस्थेत आहेत. 

हसन मुश्रीफांची जितेंद्र आव्हाडंवर एकेरी टीका 

आमची सत्ता पहिल्यांदा गेली तेव्हा भारतीय जनता पार्टी आणि शिंदे यांच्या सोबत जावे यासाठी जितेंद्र आव्हाड यांनी पुढाकार घेतला होता. यावेळी आमदारांनी सह्या केल्या त्या पेपरवर  जितेंद्र आव्हाडांची सही एक नंबरला होती. आम्ही भाजप सोबत जाणार त्यावेळी झालेल्या चर्चेत जितेंद्र आव्हाड नव्हते. माझा  भाजप सोबत जायच्या निर्णयाला विरोध असता तर मी मंत्रीपदाची शपथ घेतली असती का? असा सवाल हसन मुश्रीफ यांनी केला आहे.

 काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड?

राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे जितेंद्र आव्हड यांनी मंत्री हसन मुश्रीफांवर निशाणा साधला होता. जितेंद्र आव्हाड म्हणाले, हसन मुश्रीफ यांना विचारा कोणत्या तीन पक्षात भांडण लावण्याच काम केलं.  हसन मुश्रीफ यांच्यासोबत मी दहा मिनिटं तरी कधी बोललो असेल तर त्यांनी सांगावे,जेव्हा भाजप सोबत जाण्याचा हे विचार करत असतांना या हसन मुश्रीफ यांनी सर्वात आधी मला कॉल केला होता.  जितेंद्र  हे थांबवायला हवं,बोलायला आणि काढायला गेलो तर मी पण खूप काढू शकतो.

अजित पवार मुख्यमंत्री झाले तर आनंद होईल : जितेंद्र आव्हाड

“अजित पवार मुख्यमंत्री झाले तर आनंद होईल. राजकीय वैमनस्ये नसतं वैचारिक मतभेद असतात. त्यांनी हे समजून घ्यायला हवं आपलं वैर नाही शेतीमातीचे भांडण नाही. आम्ही त्यांच्याबरोबर गेलो नाही, त्यामुळे आम्हाला निधी दिला जात नाही, अशा पद्धतीनं वागवला जात आहे. आम्हाला एक रुपया निधी देखील दिला नाही.”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की, “आम्हाला मुख्यमंत्री यांनी निधी वाटपासाठी वेळ दिला, पण तो लॉबीत दिला. विरोधी पक्षाची लायकी लॉबीत आहे, हे त्यांनी दाखवून दिलं. चाळीस वर्ष ज्यांनी विधिमंडळात काम केलं, त्यांना निरोप आला की, लॉबीत येऊन भेटा.”

[ad_2]

Related posts