[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Beed News : मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची बीडमध्ये (Beed) होणाऱ्या इशारा सभेच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने शहरातील सर्व शाळांना सुट्ट्या देण्याचे आदेश काढले आहे. दरम्यान, आता याच आदेशावरून मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी संताप व्यक्त केला आहे. “एका समाजातील काही ठराविक लोकांच्या दबावाला, झुंडशाहीला आपला कायदा, प्रशासन बळी पडतंय का? असं असेल तर हे निश्चितच लोकशाहीला धरून नाही,” असे भुजबळ यांनी म्हटले आहे.
बीडच्या शिक्षण अधिकारी यांनी काढलेल्या आदेशाची प्रत ट्वीट करत भुजबळ यांनी म्हटले आहे की, “कोणत्याही सभेसाठी शाळांना सुट्ट्या जाहीर करण्याचे कारण काय?, कोणत्याही सभा, मेळावे यांबद्दल कोणाला आक्षेप असण्याचे काही कारण नाही. पण, त्यासाठी थेट शाळा बंद ठेवणं किंवा सुट्टी जाहीर करणं नक्कीच चुकीचं आहे. काही दिवसांपूर्वी जालना जिल्ह्यात होणार असलेल्या मनोज जरांगे यांच्या सभेमुळे जिल्हा परिषदेने आपल्या प्राथमिक शाळांना थेट सुट्टी जाहीर केल्याचे पत्रक काढले होते. त्याविरोधात आवाज उठविल्यानंतर रात्री उशिरा ती सुट्टीची सूचना मागे घेण्यात आली. त्याविरोधात मी जाहीर सभा, प्रसारमाध्यमे आणि विधानभवनातही आवाज उठवला होता. आता पुन्हा बीड जिल्ह्यात जरांगे यांच्या सभेसाठी बीड शहरातील सर्व माध्यमाच्या सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत, असल्याचे भुजबळ म्हणाले.
झुंडशाही, हुकूमशाही सुरू आहे…
पुढे बोलतांना भुजबळ म्हणाले की, ” हे या राज्यात नेमकं काय सुरू आहे? पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्या सभांच्या दिवशी देखील अशा प्रकारे शाळा बंद ठेवल्या जात नाहीत. मग जरांगेंच्या सभांवेळी ही विशेष व्यवस्था कशासाठी? मराठा आरक्षणाला किंवा त्यासाठी सुरू असलेल्या सभांना माझाच काय, कोणाचाही विरोध नाही. परंतु, ही झुंडशाही, हुकूमशाही सुरू आहे, त्याला मात्र नक्कीच विरोध आहे. मराठा समाजातील सुज्ञ बंधू-भगिनींना देखील हे अजिबात पटणार नाही. यातून आपण काय संदेश देण्याचा प्रयत्न करतोय? एका समाजातील काही ठराविक लोकांच्या दबावाला, झुंडशाहीला आपला कायदा, प्रशासन बळी पडतंय का? असं असेल तर हे निश्चितच लोकशाहीला धरून नाही. शालेय शिक्षण विभागाने याची गांभीर्याने दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करणे गरजेचे आहे. नसता महाराष्ट्रातील इतर समाजांमध्ये यामुळे चुकीचा संदेश जाण्याची भीती आहे, असेही भुजबळ म्हणाले.
कोणत्याही सभेसाठी शाळांना सुट्ट्या जाहीर करण्याचे कारण काय?
कोणत्याही सभा, मेळावे यांबद्दल कोणाला आक्षेप असण्याचे काही कारण नाही. पण त्यासाठी थेट शाळा बंद ठेवणं किंवा सुट्टी जाहीर करणं नक्कीच चुकीचं आहे. काही दिवसांपूर्वी जालना जिल्ह्यात होणार असलेल्या मनोज जरांगे यांच्या… pic.twitter.com/ZfvvcvJVpx
— Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) December 23, 2023
इतर महत्वाच्या बातम्या:
मोठी बातमी! मराठा आरक्षणाचा निर्णय 24 डिसेंबरपर्यंत होणे शक्य नाही; भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI
[ad_2]