Pune Airport New Cargo Tests At Pune Airport New Cargo Terminal Will Begin From August

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pune Airport New Cargo: पुणे विमानतळ (Pune Airport) परिसरात उभारण्यात येणाऱ्या नव्या कार्गो टर्मिनलचं जवळपास 90 टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती मिळत आहे. उर्वरित काम जुलै महिन्यापर्यंत पूर्ण केलं जाणार आहे. त्यानंतर ऑगस्ट महिन्यापासून पुणे विमानतळावरील नवं कार्गो टर्मिनलच्या सुविधांच्या चाचण्यांना सुरुवात केली जाणार आहे. तसेच, सप्टेंबर महिन्यापर्यंत या नव्या वास्तूचं उद्घाटन होण्याची शक्यता आहे. नव्या कार्गो टर्मिनलचा पुणेकरांना मोठा फायदा होणार आहे. तसेच, या कार्गो टर्मिनलमुळे पुण्यातून होणारी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मालवाहतूक दुप्पट होणार आहे. 

अशातच पुणे विमानतळावरुन प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. प्रवासी संख्येसोबतच मालवाहतूक सुद्धा मोठ्या प्रमाणावर पुणे विमानतळावरुन होत आहे. त्यामुळे पुणे विमानतळावरील जुने प्रवासी आणि मालवाहतुकीचे टर्मिनल अपुरे पडत आहे. त्या पार्श्वभूमीवर विमानतळ प्रशासनाने येथे लागूनच प्रवाशांसाठी नवीन टर्मिनल आणि मालवाहतुकीसाठी नवीन कार्गो टर्मिनल उभारण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार सध्या दोन नवी टर्मिनल उभारले जात आहेत. यापैकी कार्गो टर्मिनलचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे. 

दरम्यान, पुणे एअरपोर्टला स्वतःची जागा नाही. भारतीय वायुदलाच्या लोहगाव येथील हवाई तळाच्या जागेमध्येच पुणे एअरपोर्ट उभे आहे. हवाई तळाचा एक भाग वायुदलाकडून वापरला जातो तर एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाकडे असलेल्या दुसऱ्या भागात प्रवासी विमानांची ये जा होत असते. गेली अनेक वर्ष पुणे एअरपोर्ट नवीन जागेत सुरु करण्याची चर्चा सुरु आहे. परंतु त्यासाठी लागणाऱ्या शकडो एकर जमिनीच्या अधिग्रहणात अनेक अडचणी येत असल्यानं नवीन एअरपोर्ट उभे राहू शकले नाही. अशातच आहे त्या इमारतीला लागूनच विमानतळ प्रशासनानं नवीन टर्मिनल आणि मालवाहतुकीसाठी नवीन कार्गो टर्मिनल उभारण्याचे नियोजन केलं आहे. 

भारतीय वायुदलाच्या लोहगाव हवाई तळाच्या हद्दीतच पुणे विमानतळ 

1939 साली दुसरं महायुद्ध सुरु झाल्यानंतर इंग्रजानी पुण्याजवळील लोहगांव इथं लढाऊ विमानांसाठी हवाई पट्टी तयार केली होती. मुंबईला शत्रूच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी त्यावेळच्या रॉयल एअरफोर्सकडून लोहगावला एअरस्ट्रीप तयार करण्यात आली होती . स्वातंत्र्यानंतर भारतीय वायुदलाने या ठिकाणी लढाऊ विमानांसाठी हवाईतळ उभारला. मिग, सुखोई यासारख्या विमानाचं प्रशिक्षण देण्यासाठी हवाईदलाकडून लोहगाव हवाई तळाचा उपयोग केला जातो.

पुणे विमानतळाला 475 कोटी रुपये खर्चून वाढीव क्षमतेची नवीन टर्मिनल इमारत मिळणार आहे. पुणे विमानतळाला वाढीव क्षमतेसह नवीन टर्मिनल इमारत मिळणार. नवीन टर्मिनलचे सध्याच्या टर्मिनलसह एकत्रिकरण करण्यात येणार आहे. पुणे विमानतळाला वाढीव क्षमतेसह नवीन टर्मिनल इमारत मिळणार आहे.

[ad_2]

Related posts