[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Chandrashekhar Bawankule : मराठा आरक्षणाच्या (Maratha Resrvation) दृष्टीनं महत्त्वाची असलेली क्युरेटिव्ह पिटीशन सुप्रीम कोर्टाने (Curative petition Supreme court) स्वीकारली आहे. हा महायुती सरकारचा मोठा विजय असल्याचे मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केलं. मराठा आरक्षणासंदर्भात क्युरेटीव्ह याचिका स्वीकारल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे स्थगित झालेलं मराठा आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे बावनकुळे म्हणाले.
नेमकं काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?
महायुती सरकारचा मोठा विजय!!
राज्यातील महायुती सरकारने भक्कमपणे सुप्रीम कोर्टात बाजू मांडल्यामुळे कायदेशीर मराठा आरक्षण मिळण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. मराठा आरक्षणाच्या दृष्टीनं महत्त्वाची असलेली क्युरेटिव्ह पिटीशन सुप्रीम कोर्टाने स्वीकारली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि मविआ सरकारच्या नाकर्तेपणामुळे स्थगित झालेलं मराठा आरक्षण पुन्हा मिळण्यासाठीचा मार्ग प्रशस्त झाला. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी कुठल्याही प्रवर्गाला धक्का न लावता मराठा समाजाला दिलेलं आरक्षण पुन्हा मिळवण्यासाठी महायुती सरकार सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू मजबुतीनं मांडेल आणि मराठा समाजाला न्याय देईल ही खात्री असल्याचे ट्वीटमध्ये जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
[ad_2]