CM Eknath Shinde First Recation On Manoj Jarange Patil Announcement Mumbai Agitation Maratha Resrvation News Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

CM Eknath Shinde : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा आंदोलनाची पुढची दिशा जाहीर केली आहे. बीडमध्ये झालेल्या सभेत मनोज जरांगे यांनी येत्या 20 जानेवारीपासून मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण करण्याची घोषणा केली. जरांगेंच्या या घोषणेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आपली प्रतिक्रिया एबीपी माझाकडे व्यक्त केली.

नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?

आताच सुप्रीम कोर्टाचा निर्णय झालाय, क्युरेटिव्ह पिटीशन 24 जानेवारीला कोर्ट ऐकणार आहे. ही याचिका फेटाळेल असं म्हटलं जायचं. पण सुप्रीम कोर्ट हे ऐकणार आहे, त्यामुळे मराठा समाजासाठी मोठा दिलासा आहे. 24 जानेवारीला वकिलांची तज्ज्ञ फौज बाजू मांडेल, मराठा समाज मागास कसा आहे हे सांगेल, परिस्थिती सांगेल. सुप्रीम कोर्टाने ज्या त्रुटी मांडल्या होत्या, त्या दूर कऱण्याचं काम वकिलांची फौज करेल. मला वाटतं मराठा सामाजाला न्याय मिळेल असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. 

मागच्या सरकारने मविआ सरकारने सुप्रीम कोर्टात मराठा समाजाला मागास ठरवण्यासाठी जे पुरावे द्यायला हवे होते ते मांडले नव्हते. पण यावेळी निष्णात वकिलांची फौज बाजू मांडेल. तोपर्यंत सर्वांनी शांतता राखणे आवश्यक आहे. कायदा सुव्यवस्थता, शांतता राहिली पाहिजे, सर्व जाती धर्मांना माझं आवाहन आहे, सर्वांनी संयम राखावा, मराठा समाजाला नक्की न्याय मिळेल. क्युरेटिव्ह पीटिशन ऐकली जाणं ही जमेची बाब आहे, मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही सर्वांची इच्छा आहे, सत्ताधारी, विरोधक, आंदोलक सर्वांना वाटतं मराठा आरक्षण मिळावं ही सर्वांची इच्छा आहे. सुप्रीम कोर्टात आम्ही बाजू मांडू, सर्वांनी शांतता राखावी, असं मुख्यमंत्री म्हणाले.

काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?

राज्य सरकार वेळकाढूपणा करत मराठ्यांची फसवणूक करतंय, आम्हालासुद्धा मर्यादा आहे, आम्ही तरी किती दिवस दम काढणार? मराठ्यांना विचारल्याशिवाय मी काही करणार नाही. आपण फक्त लढायचं नाही तर जिंकायचं सुद्धा आहे असं मनोज जरांगे (Manoj Jarange) म्हणाले. त्यामुळे अंतरवाली सराटीनंतर आता मुंबईत धडकायचं आहे असं म्हणत 20 जानेवारीपासून मुंबईत मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आमरण उपोषण करण्याची मोठी घोषणा मनोज जरांगे यांनी केली आहे. 

मराठा आरक्षणालाठी लढणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी 18 जानेवारीपर्यंत नोटिस दिल्या आहेत. त्यावर बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, तुम्ही ट्रॅक्टर दाबू शकता, पण मराठ्यांना दाबू शकणार नाही. आतापर्यंत खूप झालं. आता मुंबईत 20 जानेवारी रोजी मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करण्यात येईल. त्यासाठी मराठ्यांनी शांततेत मुंबईत यायचं.  मराठा आंदोलनात जाळपोळ करू नका, जो जाळपोळ करेल तो आपला नाही असं मनोज जरांगे म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या:

Manoj Jarange : तयारीला लागा,  20 जानेवारी रोजी मुंबईत आमरण उपोषण; तुम्ही ट्रॅक्टर जप्त करू शकाल, मराठ्यांना दाबू शकणार नाही, मनोज जरांगे यांचा इशारा

 

 

 

 

[ad_2]

Related posts