Quality Plastic Industries In Palghar Has Received This Year S Maharashtra Udyog Award Marathi News 

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई: प्लास्टिकचा सर्रास होणारा वापर पर्यावरणाला मारक असतो. त्यामुळे पर्यावरणास हानिकारक अशा प्लास्टिकचा पुनर्वापर (रिसायकलिंग) करणे हाच योग्य मार्ग आहे. पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीने प्लास्टिक रिसायकलिंग कंपन्यांचा या क्षेत्रातील पुढाकार मोलाचा ठरतो.  दरम्यान महाराष्ट्राने प्लास्टिक पुनर्वापराच्या दृष्टीने या उद्योग क्षेत्रात मानाचा तुरा रोवला आहे. 2023 चा महाराष्ट्र उद्योग अवॉर्ड हा महाराष्ट्रातील अग्रगण्य रिसायकलिंग इंडस्ट्रिज कंपनी असलेल्या क्वालिटी प्लास्ट इंडस्ट्रीजला मिळाला आहे. ही कंपनी पालघर जिल्ह्यातील घोणसईमध्ये आहे.

रिसील डॉट इन तसेच इंडिया न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने एम.एस.एम.इ. प्रमाणित या वर्षीचा 2023 चा महाराष्ट्र उद्योग अवॉर्ड वन ऑफ द लिडिंग वेस्ट रिसायकलींग कंपनी इन महाराष्ट्रा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. याचा मान क्वालिटी प्लास्ट इंडस्ट्रीज ग्राम. घोणसई ता.वाडा जी. पालघर या प्लास्टिक रिसायकलिंग कंपनीस मिळाला असून, पुरस्कार वितरण सोहळा हा बहुचर्चित अभिनेत्री निर्माती तसेच उद्योजिका तेजस्विनी पंडितच्या हस्ते पुणे येथे 15 डिसेंबर 2023 रोजी प्रदान करण्यात आला. 

कंपनीचे डायरेक्टर दयानंद पाटील आणि राम पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “प्लास्टिकच्या अतिवापरामुळे जी पर्यावरण संतुलनाची समस्या आपल्यासमोर उभी आहे. त्यावर उपाय म्हणून 2016 मध्ये आम्ही एकत्र येऊन प्लास्टिक रिसायकल करण्याचे ठरविले. त्यासाठी 2016 मध्ये घोणसई ता.वाडा जी. पालघर.येथे प्लास्टिक रिसायकल युनिट उभारले. कंपनीमध्ये वेस्ट प्लास्टिक पासून ग्रनुअलस (granules)तयार करण्याचे उत्पादन होते. लवकरच ग्रनुअलस पासून आर्टिकल्स तयार करण्याचे काम सुरु करत आहोत.” 

कंपनी पर्यावरण संतुलनाचे करत असलेले कार्य  लक्षात घेऊन, रिसर्च संस्था रिसील डॉट इन तसेच इंडिया न्यूज यांनी महाराष्ट्र उद्योग अवॉर्ड 2023 या पुरस्काराने सन्मानित करत याची दखल घेतली. त्यामुळे महाराष्ट्रासाठी उद्योगिक क्षेत्रातील ही कामगिरी उल्लेखनीय आहे.

ही बातमी वाचा: 

 

[ad_2]

Related posts