[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
रायगड: अलिबाग- मुरूडचे आमदार महेंद्र दळवी (Mahendra Dalvi) यांची एमएसईबीच्या अधिकाऱ्यांला (MSEB) दमबाजी केल्याचा एक ऑडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये आमदार त्या अधिकाऱ्याला बिलांची वसुली करू नये असा सांगत आहेत. तसेच त्याला शिविगाळ करत बदली करून घे नाहीतर फटवण्याची भाषाही केली. शिवसेना शिंदे गटाचे आमदार असलेल्या दळवी यांनी त्या अधिकाऱ्याचा मर्डर करण्याचीही धमकी दिल्याचं या ऑडिओतून स्पष्ट होतंय.
काय आहे प्रकरण?
मुरूडमध्ये एमएसईबीकडून बिलांची वसुली सुरू आहे. त्याप्रकरणी आमदार महेंद्र दळवी यांनी एमएसईबीच्या राठोड नावाच्या अधिकाऱ्याला फोन केला. त्यानंतर या भागात वसुली करू नको, मंथ एन्ड आहे असं त्यांनी सांगितलं. त्यावर त्या अधिकाऱ्याने आपल्या हाती ते नसल्याचं सांगितलं.
आमदार दळवी यांनी त्यानंतर राठोड यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बोलणी केली. त्यावेळी आमदार दळवी यांनी त्या अधिकाऱ्याला अर्वाच्च शिवीगाळ केली आणि धमकी दिल्याचं दिसून येतंय.
मार खाण्यापेक्षा बदली करून जा
आमदार दळवी त्या अधिकाऱ्यासोबत बोलताना म्हणतात की, मार खाण्यापेक्षा बदली करून निघून जा. एकतर बदली करून घे नाहीतर फटकवेन. तसेच आपल्या पोरांना सांगून त्या अधिकाऱ्याला ठोकून काढण्याची भाषा दळवींनी केली. तो अधिकारी बिलांच्या वसुलीसाठी गेला तर त्याचा मर्डर अटळ असल्याचं दळवींनी या ऑडिओमध्ये म्हटल्याचं दिसून येतंय. तसेच या प्रकरणी आपण शेवटची वॉर्निंग देतो असंही ते म्हणाले.
अधिकाऱ्यांना आमदाराशी बोलायची पद्धत माहिती नाही असं दळवींनी म्हटलंय. मुरुडमध्ये एमएसईबी अधिकाऱ्याकडून लोकांना त्रास देण्यात आल्याचे दळवी यांच्या वक्तव्यातून दिसत आहे. त्यानंतर अधिकाऱ्याची बदली करा अन्यथा त्याला माझी पोर मारतील असं आमदार महेंद्र दळवी म्हणत आहेत. महेंद्र दळवी हे शिंदे गटाचे आमदार आहेत.
[ad_2]