Maval Lok Sabha Shiv Sena Thackeray Group Will Contest Sachin Ahir Claim Pune Shinde Group Shrirang Barne Maharashtra Politics

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई: लोकसभा निवडणुकीसंदर्भात अद्याप जागावाटप झालं नसताना आता प्रत्येत पक्षाकडून ताकद असलेल्या ठिकाणी दावा केला जातोय. पुणे जिल्ह्यातील मावळ मतदारसंघावर आमचा अधिकार असून ती जागा आम्हीच लढवणार अशी भूमिका शिवसेना ठाकरे गटाने घेतली आहे. राष्ट्रवादीचा शरद पवार गटही या जागेसाठी आग्रही असल्याची माहिती आहे. ठाकरे गटाच्या दाव्यानंतर एकीकडे शिरूर लोकसभा मतदारसंघाचा वाद सुरू असताना आता मावळच्या जागेवरून पुन्हा एकदा मतभेद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज मावळ लोकसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्या संदर्भात शिवसेना नेते सचिन अहिर म्हणाले की, मावळ लोकसभा मतदारसंघासाठी आमच्या पक्षाचा उमेदवार कोण असेल याचा निर्णय लवकरच होईल. पण ही जागा जिंकून आणण्यासाठी आजची महत्त्वाची चर्चा झाली. मावळ लोकसभा मतदारसंघासाठी आमच्या पक्षातील काही जण उमेदवार म्हणून इच्छुक आहेत. तर इतर पक्षातील सुद्धा नेते आमच्या पक्षात येण्यात तयार आहे. जो उमेदवार दिला जाईल त्याला  बहुमताने निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. 

मावळ मतदारसंघात श्रीरंग बारणे (Shrirang Barne) हे खासदार असून त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. श्रीरंग बारणे यांनी 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पार्थ पवार यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला होता. आता त्या ठिकाणी ठाकरे गटाने दावा केला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या शरद पवार आणि अजित पवार गटाकडूनही या मतदारसंघात निवडणूक लढवण्याची तयारी सुरू आहे. 

राष्ट्रवादीचा कोणताही प्रस्ताव अद्याप नाही

राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार गटाचा या जागेसंदर्भातील आग्रह आमच्यापर्यंत आलेला नाही. आमचा सीटिंग उमेदवार या ठिकाणी असल्यामुळे ही जागा आम्हीच लढवणार अशी भूमिका ठाकरे गटाने घेतली आहे. येत्या 21 जानेवारीला आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याचं मावळ लोकसभा मतदारसंघात नियोजन करण्यात आलं असून फेब्रुवारी महिन्यात उद्धव ठाकरे यांचाही दौरा असणार आहे. 

अजितदादांची सहा महिन्यांपूर्वीची भाषणं ऐका

अजित पवार यांच्याबद्दल बोलताना सचिन अहिर म्हणाले की, ते फार मोठे नेते आहेत, त्यांच्याबद्दल मी फार काही बोलणार नाहीत. मात्र त्यांची सहा महिन्यांपूर्वीची भाषण ऐकावीत, ते आता काय बोलतात आणि आधी काय बोलायचे हे कळेल. लोक बघतात आणि सोशल मीडिया सुद्धा पावरफुल झालाय. 

दिशा सॅलियन प्रकरणी नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सचिन अहिर म्हणाले की, एसआयटीच्या अधिकारी कोण असावेत हे कोण ठरवणार, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री त्यांचे नेते आहेत. त्यांच्यावरचा विश्वास राणेंचा उडाला आहे का?

ही बातमी वाचा: 

[ad_2]

Related posts