Oneplus 12r 8gb Ram And 50mp Camera Specifications Leaked Ace 3 Teased

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

OnePlus 12R  Feature : OnePlus (OnePlus)  लवकरच OnePlus Ace 3 आणि OnePlus 12R हे नवीन स्मार्टफोन लॉंच  करणार आहे.OnePlus Ace 3 चीनमध्ये 4 जानेवारीला लॉंच  केला जाऊ शकतो, तर OnePlus 12R 23 जानेवारीला OnePlus 12 सोबत जागतिक बाजारात लॉंच  होण्याची शक्यता आहे. OnePlus 12R चे स्पेसिफिकेशन्स असल्याचे समोर आले आहेत.आता Ace 3 ची लाँच तारीख जवळ येत असताना, ब्रँडने मोबाईलबद्दल माहिती देण्यासाठी एक पोस्टर पोस्ट केले आहे. चला तर OnePlus Ace 3/12R बद्दल जाणून घेऊया…

OnePlus 12R/Ace 3 चे फिचर 

OnePlus 12R चे स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. परंतु या लीकमधील नवीन माहिती स्टोरेजशी संबंधित आहे.  OnePlus स्मार्टफोन 8GB/16GB LPDDR5x रॅम आणि 128GB (UFS 3.1) / 256GB (UFS 4.0) स्टोरेज पर्यायांमध्ये उपलब्ध असेल.  आयर्न ग्रे आणि कूल ब्लू या दोन रंगांमध्ये हा फोन येणार असल्याचेही समोर येत आहे.

इतर वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, Ace 3/12R ला 6.78-इंच ProXDR LTPO 4.0 OLED डिस्प्ले कर्व्ड ऐजेस, 1.5K रिझोल्यूशन, 1-120Hz रिफ्रेश रेट मिळण्याची अपेक्षा आहे.  हे गोरिल्ला ग्लास व्हिक्टस+ संरक्षणासह येईल.  हा फोन Snapdragon 8 Gen 2 वर काम करेल.  फोनमध्ये 5500mAh बॅटरी दिली जाऊ शकते जी 100W SuperVOOC चार्जिंगला सपोर्ट करेल.

कॅमेरा सेटअपसाठी, OnePlus 12R मध्ये 50-मेगापिक्सेलचा Sony IMX890 कॅमेरा, OIS सपोर्टसह 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेलचा मॅक्रो कॅमेरा असण्याची अपेक्षा आहे.  समोर 16 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा असेल.  हा स्मार्टफोन Android 14 वर आधारित ColorOS 14 किंवा OxygenOS 14 सह येईल.  टिपस्टर डिजिटल चॅट स्टेशनच्या लीकनुसार, राखाडी आणि निळ्या रंगांव्यतिरिक्त, Ace 3 मेटॅलिक शाइनसह Silver रंगात येण्याची शक्यता आहे. 

OnePlus 12 5G लाँच होणार

OnePlus 12 5G स्मार्टफोन लवकरच भारतात लॉन्च होणार आहे. हा स्मार्टफोन सर्वात आधी चीनमध्ये लॉन्च करण्यात आला होता. आता स्मार्टफोन निर्माता कंपनी जागतिक बाजारपेठेत हा फोन लॉन्च करणार आहे. कंपनीने लॉन्चिंगच्या संदर्भात तारीख जाहीर केली आहे. त्यानुसार, 23 जानेवारी 2024 रोजी  OnePlus 12 5G आणि  OnePlus 12 R 5G हे दोन स्मार्टफोन जागतिक बाजारपेठेत लॉन्च करण्यात येणार आहेत.  भारतातही हा स्मार्टफोन याच दिवशी लॉन्च होईल अशी आशा आहे. याआधी स्मार्टफोनचा फ्लॅगशिप 2024 च्या सुरुवातीला लॉन्च होईल असे कंपनीकडून सांगण्यात आला होते.

इतर महत्वाची बातमी-

Redmi Note 13 Pro 5G : Redmi Note 13 Pro 5G सीरिज ‘या’ दिवशी लाँच होणार; फिचर्स आले समोर

[ad_2]

Related posts