Smriti Mandhana Answer On What Qualities Do You Like In Men In Kbc Programme Along With Ishan Kishan

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Smriti Mandhana : स्मृती मानधना भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर असली तरी सोशल मीडियावरही तिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिच्या सौंदर्याने लाखो तरुणांनी तिला क्रश केलं आहे. ‘कौन बनेगा करोडपती’च्या एका विशेष भागात जेव्हा ती इशान किशनसोबत आली तेव्हा एका चाहत्याने तिला एक प्रश्न विचारला होता. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला संघाची कॅप्टन असलेल्या स्मृतीला चाहत्याने विचारले की, तुला कोणता मुलगा आवडतो? यावर स्मृती मानधनाने अप्रतिम उत्तर दिले.

 

एका चाहत्याने विचारले की, स्मृती मॅडम, तुमचे इंस्टाग्रामवर बरेच पुरुष फॉलोअर्स आहेत. पुरुषांमध्ये तुम्हाला कोणते गुण आवडतात?

यावेळी ईशान किशनने टोमणा मारत, टर्न कर दिया, सर म्हणाला. 

अमिताभ बच्चन यांनी चाहत्यांना विचारले की, तुझं लग्न झाले आहे का?

चाहत्याने उत्तर दिलं की, नाही सर, म्हणूनच मी विचारतोय.

माझी काळजी घेतली पाहिजे आणि माझा खेळ समजून घेतला पाहिजे

यानंतर स्मृती मानधनाने थोडे लाजून उत्तर दिलं. ती म्हणाली की, मला अशा प्रश्नाची अपेक्षा नव्हती. एक चांगला मुलगा असावा, हे खूप महत्वाचे आहे. त्यानं माझी काळजी घेतली पाहिजे आणि माझा खेळ समजून घेतला पाहिजे. हे दोन मुख्य गुण त्याच्यात असायला हवेत. कारण एक मुलगी म्हणून मी त्याला तेवढा वेळ देऊ शकणार नाही. तिनं त्याला समजून घेतलं पाहिजे आणि काळजी घेतली पाहिजे. या गोष्टींना प्राधान्य दिले जाते.

स्मृती आणि इशान ‘कौन बनेगा करोडपती’च्या एका एपिसोडमध्ये दिसले होते. तिथे त्यांना या अनोख्या प्रश्नाला सामोरे जावे लागले. आत्तापर्यंत स्मृतीने 6 कसोटी, 80 वनडे आणि 125 टी-20 सामने खेळले आहेत आणि सर्व फॉरमॅटमध्ये 6 हजारहून अधिक धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच संपलेल्या कसोटी सामन्यात, मानधनाने 74 आणि नाबाद 38 धावा केल्या, ज्यामुळे भारताला महिलांच्या कसोटी सामन्यात पहिला विजय नोंदवण्यात मदत झाली.

दुसरीकडे, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेसाठी भारताच्या महिला संघाची घोषणा केली आहे. वनडे आणि टी-20 मध्ये हरमनप्रीत कौर संघाचे नेतृत्व करेल, तर स्मृती मानधना उपकर्णधार असेल. इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत संघाला 2-1 असा पराभव पत्करावा लागला, पण इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग कसोटी सामने जिंकून इतिहास रचला. 28 डिसेंबर, 30 डिसेंबर आणि 2 जानेवारीला तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये त्यांचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. सर्व सामने मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. 5, 7 आणि 9 जानेवारीला नवी मुंबईत तीन टी-20 सामने होणार आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या 

[ad_2]

Related posts