Flipkart Amazon Value For Money Smartphones Check Realme Samsung Iqoo

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Smartphone Low Budget : 2023 च्या व्हॅल्यू फॉर मनी स्मार्टफोन्सबद्दल (Smartphone) चांगलीच चर्चा रंगली. भरपूर फिचर्स आणि बजेटफ्रेंडली असल्याने अनेकांनी हे फोन्स खरेदी केले. यामध्ये iQoo, Realme, Samsung, iQOO Z7s 5G स्मार्टफोन्सचा समावेश  आहे. हे सगळे बजेटमध्ये असणारे स्मार्टफोन आहेत, ज्याच्यामध्ये चांगल्या परफॉर्मन्स सोबत चांगला डिस्प्ले देखील आहे. हे फोन 120Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येणार आहेत आणि यासोबतच 100 मेगापिक्सेल कॅमेरा सेन्सर सपोर्टदेखील आहे. 

Realme 11x 5G

किंमत 6GB+128GB- 14,999 रुपये

Realme 11x 5G स्मार्टफोन 64MP AI ड्युअल कॅमेरा सेटअपसह मिळणार आहे. या फोनमध्ये 8MP सेल्फी कैमरा सेंसर दिला आहे.शिवाय 6.72 इंच अल्ट्रा स्मूथ कॅमेरा सेंसर आहे. या फोनमध्ये 120HZ सपोर्ट देण्यात आला आहे. खास गोष्ट अशी की पावर बॅकअप साठी 5000mAh बॅटरी देण्यात येणार आहे.सोबतच 33W SUPERVOOC चार्जिंग सपोर्ट घेण्यात येईल.अजून एक वैशिष्ट्य म्हणजे MediaTek Dimensity 6199+5G चिपसेट सपोर्ट देण्यात आला आहे. हा फोन पर्पल डॉन, मिडनाईट ब्लॅक कलर या ऑप्शन मध्ये घेता येतो. 

iQOO Z7s 5G

किंमत : 6GB+128GB – 15,999 रुपये

iQOO Z7s 5G स्मार्टफोन 4500mAh बॅटरी आणि 44W फास्ट चार्जिंग सपोर्टसह घेता येतो. ह्या फोनसाठी 6.38 इंच डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबत हा फोन कॉल कॉम स्नॅपड्रॅगन 695G प्रोसेसर सपोर्ट सोबत येणार आहे.यामध्ये 64 MP OIS हा मेन कॅमेरा सेंसर सपोर्ट देण्यात आला आहे. सोबतच 2MP बोकेह कॅमेरा सपोर्ट देण्यात आला आहे.या फोनमध्ये 16MP फ्रंट कॅमेरा सेंसर लावला आहे.हा फोन नॉर्वे ब्लू आणि पॅसिफिक नाईट कलर या ऑप्शनमध्ये विकत घेता येईल. 

Realme narzo 60x 5G

किंमत : 6GB+128GB – 12,499 रुपये
Realme narzo 60x 5G स्मार्टफोन 5000mAh बॅटरी सपोर्टसह येईल.  सोबतच ह्या फोनमध्ये 33W SUPERVOOC चार्जिंग सपोर्ट असणार आहे. ह्या फोनमध्ये 50MP AI कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे, आणि 8MP सेल्फी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे.या फोनचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हा 6.72 इंच डायनामिक अल्ट्रा स्मूथ डिस्प्ले सपोर्टसह येतो. या फोन मध्ये 680 nits पीक ब्राईटनेस देण्यात आला आहे.हा फोन MediaTek Dimensity 6100+ 5G चिपसेट सपोर्टसह येईल.या फोनमध्ये टेलर क्रीम आणि नोबुला पर्पल हे कलर ऑप्शन मिळतील. 

Redmi 12 5G

किंमत : 4GB+128GB – 11,999 रुपये
Redmi 12 5G हा स्मार्टफोन 5000mAh बॅटरीसह विकत घेता येईल आणि यामध्ये 6.79 इंचाचा FHD+ डिस्प्ले असणार आहे. या फोन मध्ये90 Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. 50MP प्रायमरी कॅमेरा सेटअप सह 8MP सेल्फी कॅमेरा यामध्ये असणार आहे .या फोनला कॉलकॉम स्नैपड्रॅगन 4 Gen 2 प्रोसेसर सपोर्ट असणार आहे.  जेड ब्लॅक ,मूनस्टोन सिल्वर, पिस्टल ब्लू कलर मध्ये हा फोन तुम्हाला विकत घेता येईल. 

Realme C53

किंमत : 6GB+64GB – 8,499 रुपये
Realme C53 स्मार्टफोन 108MP कॅमेरा सेन्सरसह येईल.ह्या फोनमध्ये 8MP AI सेल्फी कॅमेरा असणार आहे आणि या फोनमध्ये 6.74 इंच 90HZ रिफ्रेश रेट सपोर्ट देण्यात आला आहे.मुख्य वैशिष्ट्य म्हणजे पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5000mah बॅटरी सपोर्ट देण्यात आला आहे. हा फोन octacore Unisoc T612 चिपसेट सपोर्टसह उपलब्ध आहे. चॅम्पियन गोल्ड  चॅम्पियन ब्लॅक या कलर ऑप्शनमध्ये हा फोन तुम्ही विकत घेऊ शकता. 

Samsung Galaxy F14 5G

किंमत : 4GB+128GB- 14,490 रुपये
Samsung Galaxy F14 5G मध्ये 6.6 इंच FHD+ डिस्प्ले आहे, जो 90Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह देण्यात आला आहे. यामध्ये पावर बॅकअप साठी 6000mAh ही बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन 50mp ड्युअल कॅमेरा  आणि फ्रंट मध्ये 8MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.या फोनमध्ये Exynos 1330 प्रोसेसर आहे. हा फोन पर्पल, ग्रीन आणि ब्लॅक या तीन कलर मध्ये तुम्ही खरेदी करू शकता.

इतर महत्वाची बातमी-

Apple Watches Ban : Apple ला अमेरिकेच्या कोर्टाकडून मोठा धक्का; अमेरिकेत Apple watches वर बंदी; काय आहे नेमकं कारण?

[ad_2]

Related posts