Pune Yerwada Jail A Prisoner Has Been Murdered In Yerawada Jail Detail Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : पुण्यातील (Pune) येरवडा कारागृहात (Yerawada Jail ) कैद्याचा खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आलीये. गुरुवार 28 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली. हत्येच्या या घटनेमुळे येरवडा कारागृह पुन्हा एकदा हादरलंय. महेश महादेव चंदनशिवे असं हत्या झालेल्या आरोपीचे नाव आहे. पूर्व वैमान्यासातून 4 कैद्यांकडून महेशची हत्या करण्यात आल्याचं समोर आलंय. चारही आरोपींच्या विरोधात पुण्यातील येरवडा पोलीस स्थानकात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. कैचीने आणि धारदार हत्याराने मानेवर वार करत महेशची हत्या करण्यात आली. 

अनिकेत समदूर, महेश तुकाराम माने, गणेश हनुमंत मोटे आणि आदित्य संभाजी मुरे अशी या संशयित आरोपींची नावे आहेत. खून, खुनाचा प्रयत्न, तोडफोड करणे, दुखापत करणे, घातक शस्त्र, अग्नीशस्त्र बाळगणे, दरोड्याची तयारी करणे, दराेडा घालणे, चोरी अशा आरोपांखाली महेश हा येरवडा कारागृहात होता. दरम्यान, इतर चौघे संशयित देखील विविध गुन्ह्यांमध्ये कारागृहात होते. पण पूर्ववैमानस्य मनात ठेवून या चौघांनी कारागृहात महेशची हत्या केली. 

महेश चंदनशिवे याच्यावर विविध पोलीस स्थानकात गुन्हे दाखल

 महेश चंदनशिवे याच्यावर पिंपरी, चिखली आणि भोसरी या पोलीस स्थानकात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 2013 ते 2022 या कालावधीत एकूण 12 गुन्ह्यांअंतर्गत त्याच्यावर कारवाई करण्यात आलीये. खुनाचा प्रयत्न, तोडफोड करणे, दुखापत करणे, घातक शस्त्र, अग्नीशस्त्र बाळगणे, दरोड्याची तयारी करणे, दराेडा घालणे, चोरी अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल होते. दरोड्याची तयारी करून अवैध शस्त्र बाळगल्या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात महेश चंदनशिवे हा 30 नोव्हेंबर 2022 पासून येरवडा कारागृहात होता. 

हत्या केलेल्यापैकी गणेश मोटे हा एका गुन्हेगारी टोळाची मोहरक्या आहे. याच टोळीचा महेश माने हा सदस्य असल्याची माहिती देण्यात आलीये.  मोटे आणि माने हे दोघेही सांगवी येथील योगेश जगताप खून प्रकरणातील संशयित आरोपी आहेत. त्याप्रमाणे  फेब्रुवारी 2022 मध्ये त्यांच्यावर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली. मोकांतर्गत ते कारागृहात आहेत. तर अनिकेत समदूर हा पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2022 मध्ये झालेल्या एका खून प्रकरणात तो वर्षभरापासून कारागृहात होता.

हेही वाचा : 

Ahmednagar : रात्रीच्या वेळी अनोळखी लोकांना लिफ्ट दिली आणि त्यांनी कार चालकाला लुटलं; डोक्यात हातोडा मारून गाडी, मोबाईल, कॅश घेऊन पोबारा

[ad_2]

Related posts