Manoj Jarange Mumbai Azad Maidan Protest Special Report

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Manoj Jarange Mumbai Protest Special Report : मनोज जरांगेंची तोफ मुंबईत धडकणार, कसा असणार प्रवास?

मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण करणार आहे. यासाठी 20 जानेवारीला आंतरवाली सराटीमधून (Antarwali Sarathi) पायी मुंबईकडे (Mumbai) लाखोच्या संख्येने मराठे कूच करतील असेही जरांगे म्हणाले आहे. मात्र, हा मुंबई दौरा कसा असणार, कोणत्या मार्गी मुंबईकडे जाणार, रस्त्यात किती मुक्काम असणार अशा सर्व प्रश्नांची आज उत्तर मिळणार आहे. कारण, या आंदोलनाची रूपरेषा आज माध्यमांद्वारे जाहीर केली जाणार असल्याची माहिती मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. 

मनोज जरांगे 20 जानेवारीला मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत लाखो मराठे देखील सोबत असणार आहे. जरांगे यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार 10 लाख वाहनं या आंदोलनात असणार आहे. अंदाजे 26 जानेवारीला जरांगे मुंबईत दाखल होतील. मात्र, आंतरवालीमधून निघाल्यावर कोणत्या मार्गाने ते मुंबई गाठणार, किती दिवसांचा प्रवास असणार, रोज किती किलोमीटर चालणार, कोणत्या गावात मुक्काम असणार, तसेच रस्त्यात कुठे सभा होणार का?, या अनेक गोष्टींचा आज खुलासा केला जाणार आहे. तर, आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास होणाऱ्या पत्रकार परिषदेतून मनोज जरांगे आपल्या मुंबई दौऱ्याची रूपरेषा स्पष्ट करणार आहे. 

[ad_2]

Related posts