( प्रगत भारत । pragatbharat.com)
Rajyog In Kundli: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, 2024 मध्ये अनेक ग्रहांचे गोचर होणार आहे. ग्रहांच्या या गोचरमुळे अनेक शुभ आणि अशुभ राजयोग निर्माण होणार आहे. दरम्यान ज्यामध्ये मालव्य आणि शश राजयोग यांच्या नावांचा समावेश आहे. शुक्र देव यांच्याकडून मालव्य राजयोगाची निर्मिती होणार आहे.
त्याचबरोबर शनी देवांच्या स्थिती बदलामुळे शश राजयोग तयार होणार आहे. शुक्र ग्रह त्याच्या उच्च राशीत मीन राशीत प्रवेश करणार आहे. शनिदेव कुंभ राशीला भेट देणार आहे. अशा स्थितीत या 2 राजयोगांचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येईल. परंतु अशा काही राशी आहेत ज्यांना यावेळी अचानक आर्थिक लाभासोबत प्रगतीची दाट शक्यता आहे. जाणून घेऊया या दोन राजयोगांच्या निर्मितीमुळे कोणत्या राशींच्या व्यक्तींना लाभ होणार आहे.
कुंभ रास (Kumbh Zodiac)
2024 हे वर्ष तुमच्यासाठी भाग्यवान ठरू शकणार आहे. शनिदेव तुमच्या कुंडलीत शश राजयोग निर्माण करतील. यावेळी तुम्हाला शुक्राचा आशीर्वादही मिळेल. या वर्षी तुमच्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा होणार आहे. नोकरी आणि व्यवसायातही प्रगती होईल. नोकरीत प्रगती होईल आणि पैसेही वाचवू शकाल. तुमची आर्थिक स्थितीही मजबूत असेल. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन या काळात सुखी असणार आहे.
वृषभ रास (Taurus Zodiac)
2024 हे वर्ष तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. यावेळी नोकरदार लोक त्यांच्या इच्छित ठिकाणी बदली होऊ शकणार आहे. सर्व योजना तुमच्या नियोजनानुसार पूर्ण होऊ शकतात. नोकरदारांना बढती मिळण्याची चिन्हे आहेत. व्यापारी वर्गातील लोकांना या वर्षी चांगला नफा मिळू शकतो. नवीन ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणीही लाभ मिळण्याची शक्यता आहे.
सिंह रास (Leo Zodiac)
दैनंदिन उत्पन्न आणि वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने 2024 हे वर्ष तुमच्यासाठी शुभ ठरणार आहे. विवाहित लोकांचं जीवन यावेळी अद्भूत असणार आहे. तुमच्या पैशाशी संबंधित योजना यशस्वी होतील. व्यावसायिक जीवनातील गोंधळही थोडा कमी होऊ शकतो. हे वर्ष करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने उत्कृष्ट ठरणार आहे. ज्या लोकांचे प्रेमसंबंध आहेत ते या वर्षी लग्न करू शकतात. तुम्ही नोकरी किंवा व्यवसायासाठी प्रवास करू शकता.
( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )