[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Sanjog Waghere : शिवबंधन बांधण्यासाठी संजोग वाघेरे मुंबईला रवाना पिंपरी चिंचवडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांना धक्का बसण्याची शक्यता. संजोग वाघेरेंनी आज शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. वाघेरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महापौर आणि माजी शहराध्यक्ष राहिलेले आहेत. आता त्यांना मावळ लोकसभा निवडणूक लढवायची आहे. महायुतीत निर्माण झालेली चुरस पाहता, त्यांना महायुतीतून तिकीट मिळण्याची शक्यता फारचं कमी आहे. त्यामुळं ते महाविकासआघाडी तून तिकीट मिळवण्यासाठी धडपड करतायेत. याचाच एक भाग म्हणून त्यांनी आज उद्धव ठाकरेंशी भेट घेतली. यावेळी मावळ लोकसभेच्या तिकिटाबाबत त्यांनी चर्चा केली. ठाकरेंनी तिकीट देण्याचा आश्वासन देताच, वाघेरे शिवबंधन बांधणार आहेत. तूर्तास तरी वाघेरेंनी प्रवास केलेला नाही.
[ad_2]