Olympian Khashaba Jadhav Birthday State Sports Day Big Announcement By Sports And Youth Welfare Minister Sanjay Bansode Maharashtra Government Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Maharashtra State Sports Day: मुंबई : ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव (Khashaba Jadhav) यांचा जन्मदिन म्हणजेच, 15 जानेवारी दरवर्षी ‘राज्याचा क्रीडा दिन’ (Maharashtra Sports Day) म्हणून साजरा केला जाणार आहे. या प्रस्तावास शासनानं (Maharashtra Government) मान्यता दिली आहे. तसेच, क्रीडा सप्ताह (Sports Week) आणि राष्ट्रीय क्रीडा दिन (National Sports Day) यासाठीच्या सध्याच्या अनुदानामध्ये वाढ करून प्रति जिल्हा 2 लाख 25 हजार रुपये देण्याचा शासनानं निर्णय घेतला आहे. यासंदर्भात क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे (Sanjay Bansode) यांनी माहिती दिली आहे. 

क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे म्हणाले की, भारताला पहिलं वैयक्क्तिक ऑलिंपिक पदक मिळवून देणारे महान कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या कार्याचा गौरव वाढवणाऱ्या कामगिरीस सातत्यानं उजाळा मिळावा, त्यातून राज्यातील विद्यमान आणि नव्या खेळाडूंनी प्रेरणा घ्यावी, याकरता त्यांचा जन्मदिन 15 जानेवारी राज्याचा ‘क्रीडा दिन’ म्हणून दरवर्षी संपूर्ण राज्यभरात साजरा करण्यात येणार आहे.

राष्ट्रीय क्रीडा दिन आणि क्रीडा सप्ताह साजरा करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यास पूर्वी 10 हजार अनुदान देण्यात येत होतं. त्यात वाढ करुन प्रत्येक जिल्ह्यास राज्याच्या क्रीडा दिनासाठी 75 हजार, राष्ट्रीय क्रीडा दिनास 50 हजार तर क्रिडा सप्ताहास 1 लाख रुपये, असे एकूण 2 लाख 25 हजार सुधारीत अनुदान देण्याचा शुक्रावारी (29 डिसेंबर 2023) शासन निर्णय काढण्यात आला आहे. ही क्रीडा प्रेमीसांठी अत्यंत आनंदाची बाब असल्याचं मंत्री बनसोडे यांनी सांगितलं. तसेच, पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा वितरण संमारंभात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. तसेच, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य क्रीडा दिवस साजरा करण्यात भरीव अनुदान उपलब्ध करुन दिलं, त्यामुळे यांचे मंत्री बनसोडे यांनी आभार व्यक्त केले आहेत.

राज्य क्रीडा दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

क्रीडा आणि युवक सेवा संचनालय, क्रीडा प्रबोधिनी, क्रीडा संकुले, प्राथमिक, माध्यमिक शाळा, कनिष्ठ वरिष्ठ महाविद्यालये, शासकीय तसेच खासगी विद्यापीठे, क्रीडा संस्था, मंडळे अकादमी, क्रीडा योजनांचा लाभ घेणाऱ्या संस्थांमध्ये साजरा केला जाणार आहे. यावेळी खाशाबा जाधव यांच्या योगदानावर व्याख्यान, क्रीडा रॅली, मरेथॉन, मार्गदर्शन शिबिर, खेळाडूंशी संवाद, क्रीडा पुरस्काराचे वितरण, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव, क्रीडा उपक्रमांचे आयोजन यामध्ये करण्यात येणार आहे. त्यास क्रीडा प्रेमींनी उत्फुर्तपणे सहभागी होण्याचं आवाहन क्रीडा मंत्री बनसोडे यांनी केलं आहे.

[ad_2]

Related posts