Teacher Romantic Photos With Student Karnataka Teacher Suspended After Romantic Photoshoot With Student On Educational Trip Goes Viral

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Viral News : सध्या सोशल मीडिया (Social Media) एका शिक्षिकेचे (Teacher) विद्यार्थ्यासोबतचे (Student) रोमँटिक फोटो (Romantic) व्हायरल (Photo Viral) झाले  आहेत. या आक्षेपार्ह फोटोंमुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. विद्यार्थी (Stundent) शिक्षिकेला (Teacher) मिठी (Hug) मारताना, किस (Kiss) करताना आणि उचलून घेतानाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. व्हायरल फोटोमध्ये दिसणारी महिला शाळेची मुख्याध्यापिका (Principal) आणि मुलगा दहावीचा विद्यार्थी (SSC Student) असल्याचं बोललं जात आहे. या प्रकरणी मुख्यध्यापिकेवर (Headmistress) शाळा प्रशासनाने (School Authority) कारवाई केल्याचं समोर आलं आहे.

सहलीला गेलेल्या मुख्याध्यापिकेचा विद्यार्थ्यासोबत रोमान्स

एका सरकारी शाळेतील (Government School) मुख्याध्यापिकेचे (Principal) विद्यार्थ्यासोबतचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल झाल्यावर शाळा प्रशासनाने तिच्यावर कारवाई केली आहे. व्हायरल फोटोंमध्ये ही शिक्षिका विद्यार्थ्यासोबत रोमान्स करताना दिसत आहे. शाळेच्या सहलीच्या वेळीचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत. हे फोटो पाहून संतापाची लाट उसळली आहे. हे फोटो पाहून गुरु आणि शिष्याच्या नात्याला काळीमा फासल्याची प्रतिक्रिया संतप्त नेटकरी कमेंट करत देत आहेत. हे आक्षेपार्ह फोटो व्हायरल झाल्यावर मुख्यध्यापिकेचं निलंबन करण्यात आलं आहे.

विद्यार्थ्यासोबत रोमँटिक फोटोशूट करणं शिक्षिकेला पडलं महागात

कर्नाटकच्या (Karnataka) चिक्कबल्लापूर (Chikkaballapura) जिल्ह्यातील (District) मुरुगमल्ला (Murugamalla) गावातील (Village)  ही आपत्तीजनक घटना समोर आली आहे. मुरुगमल्ला ग्राम सरकारी हायस्कूलमध्ये मुख्याध्यापिका आहे. व्हायरल फोटोमध्ये दिसणारा विद्यार्थी दहावी इयत्तेत शिकत असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यध्यापिका आणि विद्यार्थ्यांनी शाळेच्या सहलीच्या वेळी हे रोमँटिक फोटोशूट केल्याचं समोर आलं आहे. यावेळी शाळेतील आणखी एक विद्यार्थ्यीही तिथे उपस्थित असल्याचं चौकशीत समोर आलं आहे.

व्हायरल फोटोशूटनंतर कारवाई

व्हायरल फोटोशूटमध्ये विद्यार्थी मुख्याध्यापिकेचं गालावर चुंबन घेताना, साडीचा पदर खेचताना, मिठी मारताना आणि उचलून घेतानाचे असे आक्षेपार्ह फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये मुख्यध्यापिकाही विद्यार्थ्यासोबत हातात गुलाब पकडून रोमँटिक अंदाजात पोज देताना दिसत आहे.

शाळा प्रशासनाकडून शिक्षिकेचं निलंबन

एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित शिक्षिकेचं निलंबन करण्यात आलं आहे. ही महिला चिक्काबल्लापुरा जिल्ह्यातील चिंतामणी तालुक्यातील (Chintamani Taluka) मुरुगमल्ला गावातील सरकारी शाळेची मुख्याध्यापिका होती. अलिकडेच झालेल्या शाळेच्या सहलीदरम्यान विद्यार्थ्यासोबत आक्षेपार्ह वर्तन केल्याप्रकरणी शाळा प्रशासनाने शिक्षिकेचं निलंबन केलं आहे. याप्रकरणी शाळा प्रशासनाने चौकशीचे आदेश (Enquiry for allegedly “behaving inappropriately with a student) दिले आहेत.

हिंदुस्थान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, जिल्हा शिक्षण अधिकारी चिंतामणी यांनी शाळेतील विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी केली. यामध्ये समोर आलं की, 22 ते 25 डिसेंबर दरम्यान शाळेची शैक्षणिक सहलील विद्यार्थ्यांना होरानाडू, धर्मस्थळा, याना आणि इतर काही ठिकाणी नेण्यात आलं होतं. त्यावेळी विद्यार्थी आणि मुख्यध्यापिकेचे एका विद्यार्थ्याने रोमँटिक अंदाजातील फोटो काढले, इतर विद्यार्थी आणि शाळेतील कर्मचाऱ्यांना यासंदर्भात कोणतीही माहिती नव्हती, असंही त्यांनी सांगितलं आहे.

[ad_2]

Related posts