Water Supply Disrupted In Chhatrapati Sambhaji Nagar On First Day Of New Year Water Supply Stopped In Old City Today Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Chhatrapati Sambhaji Nagar Water Supply Disrupted : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी 12 महिने संघर्ष करावा लागतोच, मात्र नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी संभाजीनगरात पाणीपुरवठा (Water Supply) विस्कळीत झाल्याने पुन्हा एकदा महानगरपालिकेविरोधात रोष पाहायला मिळतोय. जुन्या शहराची तहान भागविणाऱ्या 700 मिमी व्यासाच्या जलवाहिनीला पाच ठिकाणी गळती असल्याचे लक्षात आल्यावर दुरुस्तीचे काम करण्यात येत आहे.  तब्बल दहा तास दुरुस्तीचे काम चालणार असून, पाणीपुरवठ्याचे टप्पे एक दिवस पुढे ढकलण्यात आल्याची माहिती महानगरपालिका प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जुन्या शहरात आज पाण्याचा ठणठणाट पाहायला मिळणार आहे. 

महानगर पालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, “जायकवाडी ते छत्रपती संभाजीनगर पर्यंत येणारी 700 मिलिमीटर व्यासाची जलवाहिनीमध्ये मोठे लिकेज झाल्यामुळे आज (1 जानेवारी) रोजी  जुने शहराला पाणीपुरवठा होणार नाही. जायकवाडी ते छत्रपती संभाजीनगरपर्यंत येणारी 700 मिलिमीटर व्यासाची सीआय पाईपलाईनमध्ये पाच मोठे लिकेज झाल्यामुळे मोठ्याप्रमाणात पाणी वाया जात असल्याने, महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाने आज लिकेज दुरुस्तीसाठी किमान दहा तासाचा शट डाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या जलवाहिनीमार्फत पाणीपुरवठा होत असलेल्या शहरातील जुन्या भागात आज पाणी येणार नाही, अशी माहिती पाणीपुरवठा विभागामार्फत देण्यात आली आहे.

‘या’ पाच ठिकाणी लिकेज…

तर, ढोरकीन पंप हाऊस, ढोरकीन प्राथमिक आरोग्य केंद्र, ढाकेफळ फाटा, फरशीनाला आणि नक्षत्रवाडी पंप हाऊस या पाच ठिकाणी मोठे लिकेज झाले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. या सर्व लिकेजची दुरुस्तीसाठी करण्यासाठी 700 मिमी व्यासाची जलवाहिनी 10 तास बंद ठेवण्याचा  निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती संबंधित विभागातर्फे देण्यात आलेली आहे.

जलवाहिनी कालबाह्य 

छत्रपती संभाजीनगर शहराला जायकवाडी धरणातून (Jayakwadi Dam) पिण्याचा पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. यासाठी 1200 आणि 700 मिमी व्यासाच्या दोन जलवाहिनीमधून शहरात पाणी येते. विशेष म्हणजे 700 मिमी व्यासाची जलवाहिनी पूर्णपणे कालबाह्य झाली आहे. 1974 मध्ये टाकण्यात आलेल्या या जलवाहिनीला तब्बल 49 वर्ष पूर्ण झाले आहेत. त्यामुळे ही जलवाहिनी सतत फुटत असते. परिणामी शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होत असतो. यासोबतच वेगवेगळ्या जलशुद्धीकरण केंद्रावर देखील सतत तांत्रिक कारणांनी पाणीपुरवठा खंडीत होत असल्याने मागील काही वर्षात छत्रपती संभाजीनगरकरांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. विशेष म्हणजे उन्हाळ्यात तर काही भागात आठ-आठ दिवस पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी येत असतात. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

छत्रपती संभाजीनगरात माफियाराज! तहसीलदारांसह महसूल पथकावर हल्ला; माफियांच्या कचाट्यातून अधिकारी कसेबसे बचावले

[ad_2]

Related posts