70 New Patients Of Corona In The State Maximum Number Of Active Patients In Thane 15 Patients Of JN.1 Variant In Pune Detail Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्यात 70 नव्या कोरोना रुग्णांची (Corona Patient) निदान झालं आहे. त्यामुळे राज्यात सध्या सक्रिया रुग्णांची संख्या ही 743 इतकी झालीये. तसेच सर्वाधिक सक्रीय रुग्ण हे एकट्या ठाणे जिल्ह्यात आहेत. त्यापाठोपाठ मुंबई जिल्ह्यात 130 सक्रीय रुग्ण असून पुण्यात 124 सक्रीय रुग्ण सध्या उपचार घेतायत. नव्या आलेल्या JN.1 या व्हेरियंटचे 15 रुग्ण एकट्या पुण्यात आढळून आलेत. 

सोमवार 1 जानेवारी रोजी 32 रुग्णांना घरी सोडण्यात आले. तसेच राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर हा 98.17 टक्क्यांवर पोहचलाय. मागील अनेक दिवसांपासून कोविडच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. तसेच नव्या आलेल्या JN.1 या व्हेरियंटमुळे पुन्हा एकदा धास्ती वाढवली आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून राज्यांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

देशातही JN.1 च्या रुग्णसंख्येत वाढ

देशातही दिवसागणिक कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचं चित्र आहे. तसेच JN.1 या व्हेरियंटच्या संख्येत देखील वाढ होत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यातच सोमवार 1 जानेवारी रोजी JN.1 या व्हेरियंटच्या रुग्णांची संख्या ही 196 वर पोहचलीये. INSACOG च्या मते, ओडिशात देखील नवीन व्हेरियंट आढळून आलाय. आतापर्यंत, देशातील दहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये  JN.1 या व्हेरियंटचे रुग्ण आढळून आलेत. 

केरळमध्ये सर्वाधिक रुग्ण

भारतीय SARS-CoV-2 Genomics Consortium (INSACOG) नुसार, आतापर्यंत केरळमध्ये JN.1 चे सर्वाधिक 83 रुग्ण आढळून आले आहेत.  यानंतर गोव्यात 51, गुजरातमध्ये 34, कर्नाटकात 8, महाराष्ट्रात 7, राजस्थानमध्ये 5, तामिळनाडूमध्ये 4, तेलंगणात 2, ओडिशा आणि दिल्लीमध्ये  प्रत्येकी एक रुग्ण आढळून आलेत.  INSACOG डेटानुसार, डिसेंबरमध्ये देशभरात नोंदवलेल्या एकूण कोविड प्रकरणांपैकी, JN.1 चे एकूण 179 रुग्ण आढळून आले, तर नोव्हेंबरमध्ये 17 रुग्ण आढळून आलेत. 

देशात 636 नव्या रुग्णांची नोंद

आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात येत आहे की, भारतात  कोविड -19 चे 636 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तसेच आता देशभरात सक्रीय रुग्णांची संख्या ही 4,394 झाली आहे. कोविडमुळे आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झालाय.  गेल्या वर्षी 5 डिसेंबरपर्यंत कोरोनाच्या दैनंदिन रुग्णांची संख्या दुहेरी आकड्यांवर आली होती, परंतु JN.1 प्रकारामुळे पुन्हा एकदा रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचं पाहायला मिळतंय.  जानेवारी 2020 मध्ये देशात कोविड-19 चा उद्रेक झाल्यापासून आतापर्यंत 4.50 कोटी रुग्णांचा कोविडची लागण झालीये. 

हेही वाचा : 

नव्या वर्षात कोरोनाची लाट येणार? जगभरातील 40 देशांत परसलाय JN.1; वेगानं वाढणाऱ्या व्हेरियंटमुळं धाकधूक वाढली

[ad_2]

Related posts