Rohini Khadse Leader Of NCP Sharad Pawar Group Hit Back To Rupali Chakankar Leader Of NCP Ajit Pawar Group Over Critisim On Supriya Sule And Amol Kolhe

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

NCP : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार गट (Sharad Pawar NCP group) आणि अजित पवार गटाचे (Ajit Pawar NCP Group) नेते टीका करणे टाळत होते. त्यानंतर मात्र, आता दोन्ही गटांच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप, टीका-प्रत्युत्तर सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) यांच्यावरून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षांमध्ये जुंपली आहे. रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्यावर टीका केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी जोरदार पलटवार केला आहे. 

रूपाली चाकणकर यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर रोहिणी खडसेंनी प्रत्युत्तर दिले आहे. खासदार सुप्रिया सुळे व अमोल कोल्हे यांना अजित पवारांनी निवडून आणले आहे, असे वक्तव्य अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी केले होते. दरम्यान रूपाली चाकणकर यांनी किमान नगरसेवक तरी होऊन दाखवावं असा टोला रोहिणी खडसे यांनी लगावला आहे. 

रुपाली चाकणकर काय म्हणाल्या?

रुपाली चाकणकर म्हणाल्या, दादांवर बोलणारे  दोन्ही खासदार दादांमुळे निवडून आले आहेत.  सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे अजितदादांमुळेच खासदार झाले आहेत. एका खासदाराला निवडून आणण्यासाठी मी आणि वळसे पाटलांनी (Dilip Walse Patil) प्रयत्न केला, नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्यावर टीका केली. तर, दादा सोबत नाही म्हणून तळ ठोकावा लागत आहे. सुप्रीया सुळे गेली 15  वर्ष अजितदादांमुळे निवडून आल्या आहेत.  बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अजित पवार राष्ट्रवादी गट आणि महायुतीचा उमेदवार निवडून येईल.  

अजित पवारांनी विरोधी पक्षांमधील नेते असो अथवा अजित पवारांचे समर्थक, अनेकांनी अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होतील असा दावा केला आहे.  आता चर्चांना राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या रुपाली चाकणकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा उधाण आले आहे. अजित पवार मुख्यमंत्री व्हावे ही आमची इच्छा आहे, असे वक्तव्य रुपाली चाकणकर यांनी केले आहे.  अजित दादांना मुख्यमंत्री होताना पाहायचं असेल तर आम्हला काम करावं लागेल. आमचं स्वप्न आहे त्यासाठी आम्ही प्रयत्न करू दादा मुख्यमंत्री व्हावं हे सर्वांची इच्छा आहे, असेही रुपाली चाकणकर म्हणाल्या. 

[ad_2]

Related posts