Pune Crime News A Drunk Girl In Pune Shoots On The Street Beating A Woman Policeman

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : पुण्यामध्ये एका मद्यधुंद तरुणीनं (Drunk Girl) चांगलाच राडा घातला. वानवडीतील (Pune Crime news) ऑक्सफर्ड कंफोर्ट सोसायटीत 31 डिसेंबरच्या रात्री ही घटना घडली. नशेत असलेल्या तरुणीनं सोसायटीचं गेट बंद करून उपद्रव केला. सोसायटीतील रहिवाशांनी पोलिसांना बोलावल्यानंतर तिनं महिला पोलीस कर्मचाऱ्यांना देखील मारहाण केली, तसंच सोसायटीच्या मालमत्तेची तोडफोड केली, असं रहिवाशांंचं  म्हणणं आहे.

अखेर पोलिसांनी बळाचा वापर करत तिला ताब्यात घेतलं. संबंधित तरुणी एका बड्या पोलीस अधिकाऱ्याची मुलगी असल्यानं तिला लगेच सोडून देण्यात आलं, असं सोसायटीतील रहिवाशांच म्हणणं आहे. 31 डिसेंबरच्या रात्री संपूर्ण देशभरात नववर्षाच्या स्वागताची तयारी सुरू होती. ठिकठिकाणी तरुण-तरुणींसोबत सर्वांनीच जल्लोषात सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचं स्वागत केलंय. या दरम्यान एका तरुणीने मद्यधुंद अवस्थेत सोसायटीमध्ये येऊन प्रचंड गोंधळ घातल्याची माहिती आहे. 

31 डिसेंबरला पुण्यात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. अनेक हॉटोल्स हाऊसफुल्ल होते. अनेक ठिकाणी लोक नवं वर्षाचं स्वागत करण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. त्यातच धिंगाण्याच्या अनेक घटना पाहायला मिळाल्या. काही परिसरात बाचाबाची झाली तर काही परिसरात तरुणांनी गोंधळ केल्याचा प्रकार समोर आला. यातच या मद्यधुंद तरुणीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. हा राडा पाहून अनेकांनी तरुणीला आवरण्याचा प्रयत्न केला, मात्र तरुणी आवरत नसल्याने पोलिसांना फोन करुन यासंदर्भात माहिती दिली गेली. पोलीस आल्यानंतर तरुणीने पोलिसांना देखील मारहाण केल्याचं बोललं जात आहे. या घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या व्हिडीओत तरुणी चांगलाच राडा घालताना दिसत आहे. हा राडा पाहून अनेक सोसायटीतील नागरिक भडकले होते. सगळे नागरिक सोसायटीत जमले होते.

पुण्यात गुन्हेगारीत वाढ 

31 डिसेंबरला पुण्यातील वेगवेगळ्या ठिकाणी नवं वर्षाचं स्वागत करण्यासाठी गर्दी केली होती. त्यामुळे पुण्यातील काही रस्तेदेखील बंद कऱण्यात आले होते. हे रस्ते बंद असल्याने अेनक तरुणांनी पोलिसांशी उपजत घालण्याचा प्रयत्न केल्याचंदेखील दिसलं तर अनेकांनी पोलिसांच्या नियमांचं पालन न केल्याचंदेखील दिसून आलं त्यामुळे तरुणांना पोलिसांचा धाक उरला आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

इतर महत्वाची बातमी-

Truck Driver Strike LIVE: राज्यात इंधन तुटवडा उद्भवणार? हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रान्सपोर्ट युनियनच्या संपाचा दुसरा दिवस, राज्यात अनेक पंपांवर रांगा

[ad_2]

Related posts