Petrol and diesel prices reduced by 2 Rs New rates effective from today Business News rate Marathi news



( प्रगत भारत । pragatbharat.com)

Petrol price Diesesl price : देशातील सर्वसामान्य जनतेसाठी एक दिलासादायक बातमी आहे. मोदी सरकारनं पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात (Petrol price Diesesl price) करण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 2 रुपयांची घसरण झाली आहे. आजपासून हे दर लागू होणार आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी सरकारनं हा मोठा निर्णय घेतलाय. केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी ट्वीटरच्या माध्यमातून यासंदर्भात माहिती दिली. दरम्यान, नवीन दर लागू झाल्यापासून कोणत्या शहरात, किती रुपयांना पेट्रोल-डिझेल मिळणार यासंदर्भातील माहिती पाहुयात. 

लोकसभा निवडणुकीच्या आधी मोदी सरकारनं सर्वसामान्य जनतेला दिलासा दिला आहे. केंद्र सरकारनं पूर्ण देशभरात आजपासून पेट्रोल आणि डिझेलचा दरात दोन रुपयांची कपात केली आहे. आज सकाळी सहा वाजल्यापासून पेट्रोल पंपावर हा नवीन दर लागू झाला आहे. मुंबईत आज सकाळी 6 वाजेपासून पेट्रोलचा नवीन भाव 104.15 प्रति लीटर तर डिझेलचा भाव 92.10 प्रति लीटर झाला आहे. 

कोणत्या शहरात पेट्रोलचे किती दर?

शहर           जुने दर         नवीन दर

मुंबई –        106.31          104.2
कोलकाता –  106.3           103.94
चेन्नई –         102.63          100.75          
नवी दिल्ली –  96.72           94.72

कोणत्या शहरात डिझेलचे किती दर?

शहर            जुने दर         नवीन दर

मुंबई –            94.27         92.15 
कोलकाता –     92.76         90.76 
चेन्नई –            94.24         92.34
नवी दिल्ली –   89.62          83.62       

महत्वाच्या बातम्या:

Petrol Diesel Prices: लोकसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक, पेट्रोल-डिझेल इतक्या रुपयांनी स्वस्त

 

अधिक पाहा..



Related posts