Morning Headlines Breaking National State News Live Headlines Bulletin Morning Today 19th June 2023 Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील…

मराठवाड्यात मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज तर विदर्भात दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा तर बिपरजॉय चक्रीवादळाचं राजस्थानमध्ये थैमान 

राज्यात पुढील 3 ते 4 दिवस मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज देण्यात आलाय. विदर्भात पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. कोकणात मान्सून पुढे सरकण्यासाठी अद्यापही परिस्थिती अनुकूल नसून 22 जूननंतर पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. चक्रीवादळ बिपरजॉयचं राजस्थानच्या अनेक भागाना जोरदार फटका बसला आहे. (वाचा सविस्तर)

बिहारमध्ये उष्णतेमुळे 24 तासात 35 जणांचा मृत्यू, तर 200 जण रूग्णालयात दाखल

 उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये गेल्या तीन दिवसांत 100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. हे मृत्यू उष्माघातानं झाले असावेत, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र यामागे दूषित पाणी हे देखील कारण असू शकतं, असं उत्तर प्रदेशच्या एका वरिष्ठ सरकारी डॉक्टरचं मत आहे. लवकरच बलियामधील पाण्याचे नमुने चाचणीसाठी पाठवण्यात येणार आहेत. उत्तर प्रदेशच्या एकट्या बलिया जिल्ह्यात 54 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 400 हून अधिक जणांवर उपचार सुरू आहेत.  (वाचा सविस्तर) 

गोरखपूरच्या गीता प्रेसला गांधी शांतता पुरस्कार, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत केलं अभिनंदन

गोरखपूरच्या गीता प्रेसला  (Gita Press Gorakhpur) गांधी शांतता पुरस्कार 2021 ने सन्मानित करण्यात आले . शांतता आणि सामाजिक सौहार्दाच्या गांधीवादी आदर्शांचा पुरस्कार केल्याबद्दल पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखालील परीक्षक मंडळाने पुरस्कार जाहीर केला .  (वाचा सविस्तर)

प्रत्यक्ष कर संकलनात मोठी वाढ, 11 टक्क्यांच्या वाढीसह 3.80 लाख कोटी रुपये जमा 

जूनमध्ये आतापर्यंत अॅडव्हान्स टॅक्स कलेक्शनमध्ये (Advance Tax Collection) चांगली वाढ पाहायला मिळत आहे. त्यामुळे 2023-24 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाच्या प्रत्यक्ष कर (Direct Tax) संकलनाची आकडेवारी चांगली असू शकते याचा अंदाज यावरुन बांधता येऊ शकतो. चालू आर्थिक वर्षात 17 जूनपर्यंत देशाचं निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन 11.18 टक्क्यांनी वाढून 3.80 लाख कोटी रुपयं झालं आहे. (वाचा सविस्तर)

नेताजी पालकर पुन्हा हिंदू धर्मात, शिवसेनेचा स्थापना दिन, राहुल गांधी यांचा वाढदिवस; आज इतिहासात… 

इतिहासात प्रत्येक दिवसाचे महत्त्व आहे. आजच्या दिवशी इतिहासात अनेक महत्त्वाच्या घडामोडी झाल्या आहेत. आजच्या दिवशी नेताजी पालकर यांना शिवाजी महाराजांनी पुन्हा हिंदू धर्मात घेतले. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी स्थापन झालेल्या शिवसेना या पक्षाची स्थापना झाली. काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांचा आज वाढदिवस आहे.  (वाचा सविस्तर)

Horoscope Today 19 June 2023 : मेष, सिंह, मीनसह ‘या’ राशींना मिळणार यशाची संधी; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य 

आज सोमवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या हालचालीनुसार आज मीन राशीच्या लोकांना शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. तुम्ही काही नवीन काम करण्याचा विचार करत आहात, त्यात तुम्हाला यश मिळेल. आजचा सोमवार मेष ते मीन राशीसाठी कसा राहील? काय सांगतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. (वाचा सविस्तर)

 

[ad_2]

Related posts