Truck Drivers Protest St Mahamandal Big Decision St Buses Will Run Smoothly Maharashtra Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नांदेड  :  हिट अँड रन कायद्याविरोधात (Hit and Run New Law)  ट्रक- टँकर चालक संपावर गेले  आहेत.  त्यामुळे इंधनाचा तुटवडा होईल या भीतीने वाहनधारकांनी इंधन भरून घेण्यासाठी गर्दी केल्याचे चित्र सर्वत्र आहे. या संपाचा फटका एसटी (ST Bus)  वाहतुकीवरही फटका बसण्याची शक्यता आहे.  मात्र लालपरी या संपातही दहा दिवस तग धरू शकेल इतका इंधनसाठा नांदेडमध्ये आहे. नांदेडच्या आगारात 45 हजार लिटर डिझेल उपलब्ध असून त्याद्वारे आगामी दहा दिवस एसटीची नियोजित वाहतूक सुरळीत धावू शकते असे आगार प्रमुखानी एबीपी  माझाशी बोलताना स्पष्ट केलय. 

विदर्भातील सर्व डेपो मिळून साडे सहा लाख लिटर डिझेल उपलब्ध

एसटी बससाठी लागणारे डिझेल सध्या ऑईल कंपन्यांच्या डेपोमधून मिळत नसल्यामुळे पोलीस सुरक्षेमध्ये तो डिझेल एसटीच्या विविध डेपोपर्यंत आणण्याचा एसटी प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्यासाठी एसटी प्रशासनानं पोलीस स्टेशनला पत्र दिल्याची माहिती एसटीचे विदर्भ उपमहाव्यवस्थापक श्रीकांत गभने यांनी दिली आहे. एसटी बसेस साठी विदर्भात रोज दोन लाख लिटर डिझेल लागते. सध्या विदर्भातील सर्व डेपो मिळून साडे सहा लाख लिटर डिझेल उपलब्ध आहे. त्यामुळे तीन दिवस एसटी सुरळीत धावू शकेल अशी स्थिती असल्याचे गभने म्हणाले. मात्र, नागपूर जिल्ह्यात एक दिवस पुरेल एवढंच डिझेल साठा असल्याने नागपुरातून दुसऱ्या जिल्ह्यात धावणाऱ्या एसटींना तिथून डिझेल भरून येण्याची सूचना करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

सध्या एसटीची काय स्थिती? 

  • सध्या एसटीच्या दररोज सरासरी 14 हजार बसेस धावतात. 
  • या बसेस साठी दररोज सरासरी 11 लाख लिटर डिझेल लागते.
  • एसटीच्या 250 डेपो मध्ये डिझेल भरण्याची सोय आहे. 
  •  इंडियन ऑइल कार्पोरेशन(IOC) व भारत पेट्रोलियम(BPCL) या दोन पेट्रोल केमिकल कंपन्यांच्या कडून एसटी महामंडळ डिझेल खरेदी करते. 
  • सर्व आगारात आजच्या दिवस पुरेल इतका डिझेल साठा सध्या आहे.
  • संप आणखीन काही दिवस चालल्यास डिझेलचे कमतरता भासून बस फेऱ्या रद्द होऊ शकतात.

एसटीच्या सर्व आगारांमध्ये किमान दोन दिवस पुरेल इतका इंधन साठा

सध्या राज्यातील सर्व एसटी आगारांमध्ये कमीत कमी दोन दिवस पुरेल इतका इंधन साठा आहे. ट्रक आणि टँकर चालकांचा संप आणखी दोन दिवस चालला तर नक्कीच सर्वसामान्यांचा प्रवासाचा माध्यम असलेल्या एसटीची चाके थांबतील अशी चिन्हे आहेत.   त्यामुळे देवदर्शनावरुन परतणाऱ्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे. 

हे ही वाचा :

स्कूल बसच्या चालकांनी संपामध्ये सहभागी होऊ नये, अन्यथा… शिक्षणमंत्र्याचा इशारा

 

[ad_2]

Related posts