Maratha Reservation Cabinet Sub-committee Meeting For Maratha Reservation CM Eknath Shinde Manoj Jarange Patil

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Maratha Reservation Meeting :  मराठा आरक्षणासंदर्भात  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथिगृह येथे मराठा आरक्षण व सुविधा मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीला सुरुवात झाली आहे या बैठकीसाठी  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह इतर सदस्य उपस्थित आहेत. या  बैठकीत मराठा आरक्षणासंदर्भातील काम कुठं पर्यंत आले आहे, आतापर्यंत किती नोंदी सापडल्या आदीबाबत आढावा घेण्यात येणार आहे. त्याशिवाय, मराठा समाजाच्या मोर्चाबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीला मराठा आंदोलक जरांगे पाटील हे व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे उपस्थित आहेत. 

मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी समूहातून आरक्षण देण्याची मागणी करण्यात येत आहे. मराठा आरक्षणासाठी मागील काही महिन्यात मराठा समाजाने आंदोलन तीव्र केले आहे. त्यातच जरांगे पाटील यांनी 20 जानेवारी रोजी मुंबईत मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज मराठा आरक्षण उपसमितीची बैठक पार पडणार आहे. 

आजच्या बैठकीत उपसमिती सदस्य मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, दिलीप वळसे पाटील, शंभूराज देसाई, निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे, निवृत्त न्यायमूर्ती मारोती गायकवाड, विविध विभागांचे सचिव उपस्थित आहेत. त्याशिवाय, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी हे व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे उपस्थित आहेत. 

 

[ad_2]

Related posts