Whatsapp Banned Record 71 Lakh Accounts In India In 2023 November

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

WhatsApp Account ban:  व्हॉट्सअॅपने गेल्या वर्षी  (Whatsapp)  नोव्हेंबरमध्ये 71 लाखांहून अधिक भारतीय अकाऊंटवर बंदी घातली आहे. कंपनीने आयटी नियम 2021 अंतर्गत ही कारवाई केली आहे. या नियमानुसार सर्व मोठ्या सोशल मीडिया कंपन्यांना दर महिन्याला युजर सेफ्टी रिपोर्ट जारी करावा लागतो. तसेच तक्रारी आणि त्यावर केलेली कारवाई ही सांगावी लागते. गेल्या वर्षी 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान कंपनीने भारतात 71 लाख 96 हजार अकाऊंट्सवर बंदी घातली आहे. यापैकी 19 लाख 54 हजार खात्यांवर कंपनीने कोणतीही तक्रार न करता स्वत:च्या देखरेखीखाली बंदी घातली आहे.

नोव्हेंबरमध्ये 8,841 तक्रारी 

नोव्हेंबरमध्ये व्हॉट्सअॅपकडे 8,841 तक्रारी आल्या, त्यापैकी सहा जणांवर कंपनीने कारवाई केली. दर महिन्याला कंपनी युजर सेफ्टी रिपोर्ट जारी करते. जर तुम्ही व्हॉट्सअॅपच्या नियम आणि अटींनुसार अकाऊंट ऑपरेट करत नसाल तर तुमच्या अकाऊंटवरही बंदी घातली जाऊ शकते. जर तुम्ही न्यूडिटी, फ्रॉड, फसवणूक, चोरी, देशाविरोधात कोणत्याही प्रकारच्या कारवायांमध्ये सामील असाल तर कंपनी कधीही तुमच्या अकाऊंटवर बंदी घालू शकते.

युजर्सच्या सुरक्षेसाठी व्हॉट्सअॅपने जारी केले नवे फीचर्स 

व्हॉट्सअॅपने गेल्या वर्षी युजर्सच्या सुरक्षेसाठी अॅपमध्ये अनेक नवीन फीचर्स जोडले आहेत, ज्यात चॅट लॉक, ईमेल अॅड्रेस लिंक, passkey अशा अनेक फीचर्सचा समावेश आहे. जर तुम्ही तुमचा ईमेल आयडी अद्याप व्हॉट्सअॅप अकाऊंटशी लिंक केला नसेल तर तो नक्की लिंक करा. असे केल्याने तुम्ही ईमेलद्वारे तुमच्या अकाऊंटवर लॉगिन देखील करू शकाल. तसेच, Passkey सेट करण्यास विसरू नका. हे आपल्याला फिंगरप्रिंटद्वारे खाते व्हेरिफाय करण्यास परवानगी देते, ज्यामुळे आकाऊंट सिक्युरीटीदेखील वाढते. 

स्टेटस अॅप होणार अपडेट 

सोशल मीडिया प्लॅटफोर्म असणारी दिग्गज कंपनी व्हॉट्सअॅप सध्या एका नवीन फीचरवर काम करत आहे. स्टेटस टॅबमध्ये तुम्ही एखाद्याचे स्टेटस पाहता तेव्हा लवकरच तुम्हाला रिप्लाय बार दिसेल. सध्या अॅपमध्ये असे काय होते की, जेव्हा तुम्ही एखाद्याचे स्टेटस पाहता तेव्हा त्याला रिप्लाय देण्यासाठी तुम्हाला खाली दिसत असलेल्या रिप्लाय अॅरोवर क्लिक करावे लागते.पण लवकरच तुम्हाला रिप्लाय बारचा पर्याय बाय डिफॉल्ट मिळेल. म्हणजे तुम्हाला कुठेही क्लिक करण्याची गरज नाही. तुम्ही रिप्लाय बारमध्ये मेसेज टाइप करून त्या व्यक्तीला थेट उत्तर देऊ शकता. या अपडेटची माहिती व्हॉट्सअॅपच्या विकासावर लक्ष ठेवणाऱ्या Wabetainfo या वेबसाइटने शेअर केली आहे. व्हॉट्सअॅपच्या या फिचरमुळे अॅप वापरणं अधिक सोप होणार आहे. 

इतर  महत्वाची बातमी-

Xamalicious Malware : ‘या’ 14 अँड्रॉइड अ‍ॅप्समध्ये सापडला धोकादायक मालवेअर, तुमच्याकडे यापैकी एकही अ‍ॅप नाही ना?

 

 

 

 

[ad_2]

Related posts