Sanjay Jagtap Reaction On Vijay Shivtare Allegation On Bogus Voter Congress Vs Shiv Sena In Pune Purandar Vidhan Sabha Constituency Maharashtra Politics

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : पुरंदरमध्ये 32 हजार मतदार हे बोगस असल्याचं म्हणणारा विजय शिवतारे (Vijay Shivtare) हा खोटारडा आणि बाजार बुणगा माणूस असल्याची टीका काँग्रेसचे आमदार संजय जगताप (Sanjay Jagtap) यांनी केला. एकाच वेळी 32 हजार लोकांना नोटिस देणाऱ्या प्रशासनाने तेवढे लोक एकाच दिवशी आले तर काय करणार याचीही माहिती द्यावी असं ते म्हणाले. राज्याचे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी संजय जगताप यांच्यावर केलेल्या आरोपांना त्यांनी उत्तर दिलं. 

पुरंदर विधानसभा मतदारसंघांमध्ये 32 हजार बोगस मतदार नोंद (Purandar Bogus Voter) असल्याचा आरोप माजी मंत्री विजय शिवतारे यांनी केला होता. या आरोपानंतर आता पुरंदरचे आमदार संजय जगताप हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. विजय शिवतारे बाजार बुनगे असल्याचं संजय जगताप म्हणाले आहेत. 32 हजार लोकांना निवडणूक आयोगाच्यावतीने नोटीस देण्यात आलेल्या आहेत. त्यांना 4 जानेवारीला सासवड येथे बोलण्यात आले आहे. यासंबंधी आमदार संजय जगताप यांनी प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलं. 

32 हजार लोकांची काय सोय केली? 

पुरंदर तालुक्यातील तहसील कार्यालयात जाऊन आमदार संजय जगताप यांनी निवडणूक विभागाला याचा जाब विचारला. 32 हजार लोक एकाच दिवशी येणार असतील तर त्यांच्यासाठी काय सोय केली आहे? असा प्रश्न त्यांनी विचारला. यापूर्वीच आम्ही याबाबतची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली होती. मात्र त्याच्यावर कोणती कारवाई झाली? असा सवालही त्यांनी विचारला आहे. 

शिवसेना शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष आणि युवा सेना तालुका अध्यक्ष या दोघांच्याही कुटुंबीयांची नावे दोन गावात असून त्यांच्यावर कारवाई का करण्यात आली नाही? असा सवाल आमदार संजय जगताप यांनी विचारलाय.

विजय शिवतारे नेमके कोण? 

विजय शिवतारे हे पुण्यातील पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. यापूर्वी ते पुरंदर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडून येत असत. 2014 मध्ये फडणवीस सरकारमध्ये त्यांनी राज्यमंत्रिपद सांभाळलं आहे. त्यांनी साताऱ्याचे पालकमंत्रिपदही भूषवलं होतं. पण त्यानंतर राज्यात बंड झालं आणि शिवसेनेला मोठं खिंडार पडलं. त्यानंतर अनेकांनी ठाकरेंची साथ सोडून शिंदेंना पाठिंबा दिला. त्यामध्ये विजय शिवतारेंचाही समावेश होता. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर विजय शिवतारेंनी ठाकरेंना जय महाराष्ट्र करुन शिंदे गटात प्रवेश केला. तेव्हापासूनच सातत्यानं ठाकरेंवर आरोप-प्रत्यारोप करणाऱ्या शिंदे गटातील महत्त्वाच्या नेत्यांमध्ये विजय शिवतारेंचाही समावेश होतो. 

विजय शिवतारे, तुला यंदा दाखवतो तू कसा आमदार होतो ते, अशा शब्दात विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी शिवतारे यांना थेट आव्हान दिलं होतं. त्यानंतर शिवतारेंना पराभवाचा धक्का बसला होता.

ही बातमी वाचा: 

 

 

[ad_2]

Related posts