[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
नागपूर : हिट अँड रन कायद्याविरोधात (Hit and Run New Law) ट्रक आणि टँकर चालकांनी पुकारलेल्या संपापाठोपाठ आज नागपुरातील (Nagpur News) स्कूल बस आणि स्कूल व्हॅन चालकांनी देखील एकदिवसीय लक्षणीय संप पुकारला आहे. परिणामी याचा फटका शालेय विद्यार्थ्यांना बसला असून आज सकाळपासून आपल्या पाल्यांना शाळेत ने-आण करण्यासाठी पालकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. या एकदिवसीय संपामध्ये नागपूर शहर आणि ग्रामीण भागातील 3 हजाराहून आधिक स्कूल बस आणि 700 हून अधिक स्कूल व्हॅन चालक सहभागी झाले आहेत. आधीच शहरात पेट्रोल टंचाईमुळे नागरिक त्रस्त झाले असताना, आता नव्याने उद्भवलेल्या या समस्यांमुळे विद्यार्थ्यांसह पालकांची डोकेदुखी वाढली आहे.
शालेय विद्यार्थ्यांसह पालकांची कसरत
मागील दोन दिवसांपासून मालवाहतूकदार, टँकर चालकांचा संप सुरू असल्याने राज्यासह देशात अनेक ठिकाणी इंधनापासून ते भाजीपाला, अत्यावश्यक गोष्टींचा पुरवठा थांबला होता. देशभरात ट्रक चालकांनी संप पुकारल्याने पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याचे चित्र होते. अनेक ठिकाणी पेट्रोलपंप इंधनाअभावी ओस पडले होते. तर, पेट्रोल भरून घेण्यासाठी ठिकठिकाणी पेट्रोल पंपावर रांगाच रांगा लागल्या होत्या.
नागपूर शहरातील जवळ जवळ 75 टक्के पेट्रोल पंप 2 डिसेंबरच्या दुपारपर्यंत कोरडे ठाक झाले होते. तर, उर्वरित साठा रात्रीपर्यंत संपण्याची भीती विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अमित गुप्ता यांनी व्यक्त केली होती. या संपाची धग तीव्र होत असताना दुसरीकडे केंद्र सरकारने मालवाहतूकदारांच्या संघटनांना चर्चेसाठी बोलावले. या चर्चेत संपाबाबत अखेर तोडगा काढण्यात आला. असे असले तरी नागपुरातील स्कूल बस आणि स्कूल व्हॅन चालकांनी या संपाला पाठिंबा दर्शवत एकदिवसीय आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे बऱ्याच शालेय विद्यार्थ्यांनी आज घरीच राहणे पसंद केल्याचे चित्र आहे.
इंधन असेपर्यंत सेवा देणार, महाराष्ट्र स्कूल बस असोसिएशनची भूमिका
केंद्रीय गृहसचिवांशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसनं ट्रक आणि टँकरचालकांना त्यांचा देशभरातला संप मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. तर दुसरीकडे स्कूल बसेसला जोपर्यंत डिझेल मिळेल तोपर्यंत बस रस्त्यावर धावतील आणि सेवा देतील,अशी भूमिका महाराष्ट्र स्कूल बस असोसिएशन अध्यक्ष अनिल गर्ग यांनी दिली आहे.
मालवाहतूकदारांनी संप जरी मागे घेतला असला तरी सलग दोन दिवसांच्या संपामुळे राज्यात अनेक भागात इंधनाचा तुटवडा आहे. हिट अँड रन कायद्याविरोधातील आंदोलनाला पाठिंबा नाही किंवा त्यात सहभागी झालेलो नाहीत. संपाला पाठिंबा नसला तरी इंधन असेपर्यंत सेवा देणार अशी भूमिका स्कूल बस असोसिशनने घेतली आहे. असे असतांना देखील नागपुरातील स्कूलबस आणि स्कूल व्हॅन चालकांनी आपली वेगळी भूमिका घेत हे एकदिवसीय आंदोलन केले आहे.
हे ही वाचा :
[ad_2]