Pune Crime News Lonavala Police Arrest 3 People Md Drugs Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : लोणावळा आणि परिसरात ड्रग्ज पेडलारांविरोधात मागील काही दिवसांपासून पोलिसांनी धडक कारवाई सुरु केली. बुधवारी लोणावळा पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करत सव्वा लाख रुपयांचा एमडी ड्रग्ज जप्त केला. पोलिसांनी तीन आरोपींना बेड्याही ठोकल्या. सत्यसाई कार्तीक यांच्या संकल्प नशामुक्ती अभियानांतर्गत परिसरात ड्रग्ज तस्करी करणाऱ्यावर कारवाई करण्यात येतेय.  

लोणावळा उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकरल्यानंतर गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे. मावळ परिसरातील ड्रग्सचा वाढता विळखा रोखण्यासाठी व तरुणाईला नशेच्या आहारी जाण्यापासून परावृत्त करण्यासाठी तसेच परिसर ड्रग्समुक्त करण्यासाठी संकल्प नशामुक्ती अभियान हाती घेतले आहे. त्याचाच एक भाग म्हणून सत्यासाई कार्तिक यांनी मावळ परिसरातील अमलीपदार्थ विकणाऱ्या गुन्हेगारांविरोधात संकल्प नशामुक्ती अभियानांतर्गत कठोर कारवाया हाती घेतल्या आहेत.  सत्यसाई कार्तीक यांना गुप्त बातमीदारामार्फत अशी बातमी मिळाली होती की , कामशेत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे ताजे व नायगाव परिसरात काही इसम हे मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर एमडी या अमलीपदार्थाची अतिशय छुप्या पद्धतीने विक्री करत आहे.  त्यामुळे परिसरातील तरुणाई ड्रग्स च्या विळख्यात अडकत चालली आहे. 

सापळा रचून आरोपीला ठोकल्या बेड्या 

बातमीचे गांभीर्य ओळखून सत्यासाई कार्तीक यांनी अत्यंत कमी वेळेमध्ये सदर आरोपींचा येण्या जाण्याचे मार्ग, त्यांची कार्यपद्धती याची माहिती मिळवलं. त्यानंतर पथक नेमलं. 30 डिसेंबर रोजी मध्यरात्री सापळा रचला. 31 डिसेंबर रोजी तीन आरोपींना ताब्यात घेतले.  खंडू कुटे हा त्याचे बाईकवरून ताजे गावाकडून पिंपलोळी गावाकडे येत आहे, अशी खात्री होताच पथकाने त्यास चहू बाजूंनी घेरले, परंतु पोलिसांची चाहूल लागताच आरोपी खंडू कुटे हा कारवाईच्या भीतीने त्याची बाईक भरधाव वेगात पळवत तेथून पसार होण्याचा प्रयत्न करू लागला. परंतु पोलीस पथकाने जीवाची पर्वा न करता आरोपी खंडू कुटे यास सिनेस्टाईल पद्धतीने ताब्यात घेतले. तसेच पंचांसमक्ष त्याची झाडाझडती घेतली असता त्याचे ताब्यातून 30 ग्रॅम वजनाचा 90,000/- किमतीचा विक्रीसाठी आणलेला एमडी हा अमलीपदार्थ व त्याची पॅकिंग व विक्री करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पॅकींग च्या प्लास्टिकच्या पिशव्या असा एकूण सुमारे 1,30,000 रू/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

इतर दोघांनाही ठोकल्या बेड्या

त्यानंतर 31 डिसेंबर रोजी रात्री 20.55 वा सत्यसाई कार्तीक यांनी पथकासह नायगाव परिसरात सापळा रचला.  आरोपी रोशन चंद्रकांत ओव्हाळआणि  अमीत भरत भानुसघरे या दोघांना दुचाकीवरून  एम डी हा अमलीपदार्थ विक्री करण्यासाठी आलेले असताना अटक केली. त्यांच्याकडे अंगझडतीत दोघांकडे प्रत्येकी 5 ग्रॅम असा एकूण 30,000 रू किमतीचा 10 ग्रॅम एम डी अमली पदार्थ मिळून आला आहे. कामशेत पोलीस स्टेशन येथे दोन स्वतंत्र गुन्हे नोंद कण्यात आले असून पुढील तपास कामशेत पोलीस करत आहेत.

 

[ad_2]

Related posts