Over 2 Lakh Tech Employees Laid Off In 2023 First Half More Than 27 Thousand In India

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

New Delhi: यंदा 2023 वर्षाच्या पहिल्या सहामाहीत मोठ्या टेक कंपन्यांपासून ते स्टार्टअप्सपर्यंत 2.12 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरुन काढण्यात (Employess Lay Off) आलं आहे. क्रॉस कटिंगदरम्यान अनेक जणांना आपली नोकरी गमवावी लागली. लेऑफ ट्रॅकिंग साइट Layoffs.fyi च्या डेटानुसार, 30 जूनपर्यंत 819 टेक कंपन्यांनी सुमारे 2 लाख 12 हजार 221 कर्मचाऱ्यांना कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

त्या तुलनेत, 2022 मध्ये 1 हजार 46 टेक कंपन्यांनी 1.61 लाख कर्मचार्‍यांना काढून टाकलं. एकूणच, 2022 मध्ये आणि या वर्षाच्या जूनपर्यंतची आकडेवारी पकडता सुमारे 3.8 लाख टेक कर्मचाऱ्यांनी त्यांच्या नोकऱ्या गमावल्या आहेत.

अधिकाधिक मोठ्या टेक कंपन्या कर्मचार्‍यांना काढून टाकणं सुरू ठेवत असल्याने त्यांनी नोकर कपातीच्या हालचालींमागील विविध कारणं नमूद केली आहेत. उच्च नियुक्ती, अनिश्चित जागतिक आर्थिक परिस्थिती, कोविड-19 च्या महामारीमुळे नोकर कपात केल्याचं अनेक मोठ्या टेक कंपन्यांनी म्हंटलं आहे.सततच्या नोकर कपातीमुळे भारतीय टेक इकोसिस्टममधील परिस्थिती गंभीर आहे.

या वर्षी आतापर्यंत 11,000 हून अधिक भारतीय स्टार्टअप कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकण्यात आलं आहे, जे गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत जवळपास 40 टक्के जास्त आहे. आता जागतिक स्तरावर स्टार्टअप कर्मचार्‍यांमध्ये भारताचा वाटा जवळपास 5 टक्के आहे.

Inc42 च्या आकडेवारीनुसार, 2022 मध्ये क्रॉस कटिंगदरम्यान 102 भारतीय स्टार्टअप्सनी 27,000 हून अधिक कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकलं आहे. भारतात सुमारे 22 एड-टेक स्टार्टअप्स आहेत, ज्यातील 7 एड-टेक कंपन्यांनी आतापर्यंत सुमारे 10,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं आहे.

तसेच, 2023 च्या पहिल्या सहामाहीत भारतात कोणतेही नवीन युनिकॉर्न नव्हते. कारण जानेवारी ते जून या कालावधीत स्टार्टअप फंडिंग एक वर्षापूर्वीच्या तुलनेत 70 टक्क्यांनी कमी झाले आहे. स्टार्टअप क्षेत्रात नोकर कपात अजूनही सुरुच आहे. ही परिस्थिती अशीच सुरू राहिल्यास भविष्यात आर्थिक मंदीचा सामना करावा लागेल.

मार्केट इंटेलिजन्स फर्म ट्रॅकर्सने IANS सोबत शेअर केलेल्या डेटानुसार, भारतीय स्टार्टअप्सनी पहिल्या सहा महिन्यांत केवळ $5.48 बिलियन जमा केले. मागील वर्षी याच कालावधीत त्यांनी $19.5 अब्ज उभे केले होते.

अमेरिकेतील आयटी क्षेत्रातील कंपन्यांवर अजूनही मंदीचं सावट दिसून येत आहे. यंदाचं वर्ष हे मंदीचं असल्याचं अनेकांनी यापूर्वी सांगितलं आहे. त्याचीच आता प्रचिती येत असल्याचं दिसून येतंय. अ‍ॅमेझॉनच्या तिमाहीतील नफ्यात मोठी घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्यामुळे कंपनीने 9000 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं होतं.

हेही वाचा:

E-Commerce Websites : ई-कॉमर्स कंपन्या ग्राहकांना सबस्क्रिप्शनच्या जाळ्यात अडकवतात, बाहेर पडणं कठीण; ‘या’ नंबरवर तक्रार

[ad_2]

Related posts