Maharashtra Weather News Cloudy Weather In Some Parts Of The State And Chances Of Rain In Some Parts

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Maharashtra Weather : राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. कुठं ढगाळ वातावरण आहे तर कुठं थंडीचा कडाका जाणवत आहे. तर काही ठिकाणी तुरळक पाऊस देखील पडत आहे. सध्याच्या वातावरणीय बदलानुसार 7 जानेवारीपर्यंत मुंबईसह कोकण आणि संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहणार आहे. तर काही ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी दिली आहे. 

 विदर्भ मराठवाड्यात  देखील ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. आज आणि उद्यापर्यंतच हे वातावरण टिकून राहू शकेल अशी माहिती मामिकराव खुळे यांनी दिली. आज संपूर्ण महाराष्ट्रात सध्याचे पहाटेचे किमान तापमान हे 16 डिग्री से. ग्रेड आणि दुपारचे कमाल तापमान 30 डिग्री से. ग्रेड  दरम्यान जाणवत आहे. पहाटेचे किमान तापमान सध्या त्यांच्या सरासरी तापमानापेक्षा 4 डिग्री से. ग्रेडअधिक आहे. तर दुपारचे कमाल तापमान सरासरीच्या पातळीत आहे. ही दोन्हीही तापमाने रविवार 7 जानेवारीपर्यंत ह्याच पातळीत राहण्याची शक्यता जाणवत असल्याचे खुळे म्हणाले.

महाराष्ट्राबरोबरच मुंबईतही ढगाळ वातावरण

मुंबईसह कोकणात सध्याचे पहाटेचे किमान तापमान हे 20 डिग्री से. ग्रेड आणि दुपारचे कमाल तापमान 30 ते 32 डिग्री से. ग्रेड  दरम्यान जाणवत आहे. तेथील ही दोन्हीही तापमाने सध्या त्यांच्या सरासरी तापमानापेक्षा 2 डिग्री से. ग्रेडने अधिक आहे. ही दोन्हीही तापमाने रविवार 7 जानेवारीपर्यंत ह्याच पातळीत राहण्याची शक्यता जाणवत असल्याचे माणिकराव खुळे म्हणाले. विना अडथळा उत्तरेकडून अधिक उंचीवरुन मुंबईत येणारे थंड कोरडे वारे आणि निम्न पातळीतून दक्षिण भारतातूनही पूर्वदिशा झोताचे आर्द्रतायुक्त वारे, ज्यांचे सह्याद्रीमुळे दिशा बदलातून गुजराथच्या डांगी घळीतून सध्या मुंबईत प्रवेशित होत आहे. ह्या दोन वाऱ्यांच्या  संयोगातून महाराष्ट्राबरोबर मुंबईत ढगाळ वातावरण जाणवत आहे.
    
दरम्यान, ढगाळ वातावरणामुळं कमी सूर्यप्रकाश आणि समुद्रसपाटीमुळं मुंबईत सध्य:स्थितित असलेला हवेचा उच्चं दाब आणि त्यात मुंबईतील धुरयुक्त प्रदूषित शांत हवा ह्या तिघांच्या एकत्रित परिणामातून जमिनीलगतच धुरयुक्त धुक्याचे  मळभ सध्या मुंबईत  जाणवत आहे. मुंबईत हे वातावरण कदाचित पुढील तीन दिवस म्हणजे रविवार 7 जानेवारी पर्यंत टिकून राहण्याची शक्यता जाणवत असल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली. 

महत्त्वाच्या बातम्या:

[ad_2]

Related posts