Sunil Kamble First Reaction After Rada In Sassoon Hospital Maharashtra News ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Sunil Kamble : मी फक्त ढकलंल मारहाण केली नाही, भाजप आमदार सुनील कांबळेंची प्रतिक्रिया

Pune News: पुणे : पुण्यातील (Pune News) ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) राडा झाला असून भाजप (BJP) आमदार सुनील कांबळेनी (Sunil Kamble) राष्ट्रवादीच्या (NCP) जितेंद्र सातव (Jitendra Satav) यांच्या कानशिलात मारली आहे. उद्घाटन पाटीवर नाव नसल्यानं सुनील कांबळे संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं. तसेच, त्यानंतर सुनील कांबळेंनी पोलीस शिपायाच्याही कानशिलात लगावली, स्टेजवरून खाली उतरताना आमदार सुनील कांबळेंनी पोलीस शिपायाच्या कानशिलात लगावल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

मारहाणीच्या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत असूनही भाजप आमदार सुनील कांबळे यांनी मारहाण केल्याचा इन्कार केला आहे. आपण कोणालाही मारहाण केली नाही, केवळ त्या कर्मचाऱ्याला बाजूला केलं, असं आमदार कांबळे यांनी म्हटलं आहे. राग प्रशासनावर होता, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो, कार्यक्रम पत्रिकेत नाव नसल्यानं नाराज होतो, असं ते म्हणाले. मात्र मारहाण केली नाही, असा दावा त्यांनी केला आहे. 

[ad_2]

Related posts