Cm Eknath Shinde Speech On Shirur Lok Sabha Election Shivajirao Adhalarao Patil Vs Ncp Amol Kolhe Maharashtra Marathi News 

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे: दीड वर्षापूर्वी मी शिवसेना वाचवण्याची भूमिका घेतली, पण ज्यांनी सातत्याने खोटं बोलनू अनेकांचा अपमान केला त्यांची जागा दाखवून द्यावी लागेल असं वक्तव्य करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसंकल्प अभियानाची शिरूर मतदारसंघातील खेड या ठिकाणाहून सुरुवात झाली. त्यावेळी ते बोलत होते.

शिवसेना वाचवण्याची भूमिका मी घेतली

ठाकरेंची साथ सोडून आपण दीड वर्षापू्र्वी शिवसेना वाचवण्याची भूमिका घेतल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ते म्हणाले की, “खोटं बोलून त्यांनी युती तोडली, हजारो लाखो माणसांचा विश्वासघात केला, त्यांनी शिवसैनिकांशी गद्दारी केली, त्यांना आता धडा शिकवायची वेळ आली आहे. आता आपल्या पक्षात रोज लोक प्रवेश करतात, मग मी जर चुकलो असतो तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर साथ मिळाली असती का? हजारो, लाखो शिवसैनिक विश्वासाने भगवा खांद्यावर घेत आहेत. शिवसेना वाचवण्याची भूमिका मी घेतली.”

एकनाथ शिंदे म्हणाले की, एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार असल्याची घोषणा बाळासाहेबांनी केली होती, 1995 साली सत्ता आल्यानंतर बाळासाहेबांनी ठरवलं असतं तर ते मुख्यमंत्रीपदी बसले असते. पण त्यांनी तसं केलं नाही. मुख्यमंत्रीपदाची संधी आली त्यावेळी मात्र उद्धव ठाकरे यांनी उडी मारून त्या जागी बसले.

हे सरकार सामान्य लोकांचे 

अंगणवाडी सेविका यांचा विषय आम्ही हाती घेतला आहे. तो पण सोडवल्याशिवाय राहणार नाही.  हे सामान्य लोकांचे सरकार आहे. महिलांना एसटी सवलत दिली, त्याचा फायदा होतोय. शासन आपल्या दारी कार्यक्रमाचा लाभ  2 कोटी लोकांनी लाभ घेतला. 1.5 वर्षापूर्वी निर्णय घेतला नसता तर शिवसेना रसातळाला गेली असती.

 

[ad_2]

Related posts