How To Get Rid Without Surgery From Piles Or hemorrhoids And Constipation With Including These 5 Vegetables Foods In Diet At Home; सर्जरी न करता मूळव्याध आणि बद्धकोष्ठतेपासून मुक्ती मिळवायची असेल तर आहारात या ५ फायबर रिच भाज्यांचा समावेश करा

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

कोबी वर्गीय भाज्या

कोबी वर्गीय भाज्या

कोबी वर्गीय भाज्यांमध्ये ब्रोकोली, फुलकोबी, ब्रसेल्स स्प्राउट्स, अरुगुला, बोक चोय, कॅले, मुळा, सलगम आणि कोबी यांचा समावेश होतो. NIH वर प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, या भाज्यांमध्ये म विरघळणाऱ्या फायबरचे प्रमाण जास्त असते. 1 कप (76 ग्रॅम) कच्च्या ब्रोकोलीमध्ये सुमारे 2 ग्रॅम फायबर असते. फायबर मोठ्या प्रमाणात असल्याने मलत्याग करणे सोप्पे होते.
(वाचा :- अशा प्रकारच्या खोकल्याकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, ही 5 लक्षणे ओरडून ओरडून सांगतात की तुम्हाला झाला Lung Cancer)​

शिमला मिरची

शिमला मिरची

जर तुम्हाला मूळव्याधचा त्रास होत असेल तर तुम्ही तुमच्या आहारात शिमला मिरचीचा समावेश करा. USDA नुसार, एक कप (92 ग्रॅम) चिरलेली शिमला मिरची सुमारे 2 ग्रॅम फायबर प्रदान करते. याशिवाय या भाजीमध्ये पाण्याचे प्रमाणही जास्त असते.
(वाचा :- रक्ताच्या नसा ब्लॉक करणारे घाणेरडे कोलेस्ट्रॉल अन् शुगर एका फटक्यात पातळ करतो हा पदार्थ, असरदार Homeopathy उपाय)​

हिरव्या पालेभाज्या

हिरव्या पालेभाज्या

हिरव्या भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स आणि पोषक तत्व असतात जे पचनास मदत करतात. मुळव्याधपासून आराम मिळवण्यासाठी पचनसंस्था मजबूत करणे आवश्यक आहे. पालक, ब्रोकोली, स्प्राउट्स, गाजर, ब्रसेल्स, कोबी, टोमॅटो, शतावरी, फ्लॉवर, कांदा, काकडी अशा काही भाज्या आहेत ज्या मूळव्याध असताना खाव्यात.

(वाचा :- डॉक्टर म्हणतात या कारणामुळे रात्री नसं दबली जाते किंवा एकमेकांवर चढते, क्रॅम्प समजून दुर्लक्ष करणं पडेल महागात)​

आर्टिचोक किंवा ब्रांगी

आर्टिचोक किंवा ब्रांगी

या भाजीला इंग्रजीत Artichoke म्हणतात. या भाजीमध्ये भरपूर फायबर असते. 128 ग्रॅम भाजीमध्ये सुमारे 7 ग्रॅम फायबर असते. आतड्यांमध्‍ये चांगले बॅक्टेरिया वाढवण्‍यासाठीही ही भाजी उपयुक्त आहे. याच्या नियमित सेवनाने मूळव्याध दूर होतो.
(वाचा :- डाएटिंग अन् एक्सरसाईजपेक्षाही जबरदस्त आहे महान ऋषीमुनींनी सांगितलेला हा वेटलॉस उपास, वाफेसारखी उडून जाईल चरबी)​

कंदमुळे

कंदमुळे

मुळा, सलगम, बीटरूट, गाजर, रताळे आणि बटाटा या कंदमुळ भाज्या आहेत. यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात आढळते. NCBI वर प्रकाशित केलेल्या एका अभ्यासानुसार कंदमुळे ही पचनसंस्था मजबूत करण्याचे काम करतात. फायबर व्यतिरिक्त, ते तुमच्या आतड्यांमधील चांगले बॅक्टेरिया वाढवण्याचे काम करतात आणि मल सहज बाहेर टाकण्यास मदत करतात.

(वाचा :- Ayurveda नुसार पावसाळ्यात या एका प्रकारे प्यायल्यास दूध सुद्धा बनतं औषधं, पोट साफ होतं आणि इम्युनिटी होते तगडी)​
टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

[ad_2]

Related posts