Chhagan Bhujbal Sunil Tatkare Praful Patel Criticism On Sharad Pawar Rohit Pawar Ncp Crisis Maharashtra Politics 

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई: आम्ही सत्तेत जाण्याचा घेतलेला निर्णय खूप विचारपूर्वक घेतला आहे, भावनाविवश होऊन घेतलेला नाही, आम्हाला इकडे यायला तुम्ही परिस्थिती निर्माण केली असं म्हणत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) शरद पवार गटावर टीका केली. आम्ही आमचं बघतो, तुम्ही तुमचं बघा असा सल्लाही त्यांनी शरद पवार गटाला दिला. तर प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे हे माझी सारखी चेष्टा करतात अशी गंमतीने तक्रारही त्यांनी अजित पवार यांच्याकडे केली. अजित पवार गटाच्या एका कार्यक्रमाच्यावेळी ते बोलत होते. 

‘मैं पुराणे जमानेका शिक्का हूँ, मुझे फेक ना देना, हो सकता हैं बुरे दीनो में में ही चल जाऊ’ अशा शेरोशायरीच्या अंदाजात छगन भुजबळांनी आपल्या भाषणाला सुरूवात केली. ते म्हणाले की, “आम्ही पक्ष उभा केला, ध्वज उभा केला,  मी राज्याचा पहिला प्रदेशाध्यक्ष झालो. हल्ली आमच्यावर काही लोकं टीका करतात. त्यांना सांगणं आहे पक्ष स्थापन केला त्यावेळी तुमचा राजकीय जन्म होणार होता. आम्ही पक्ष वाढवला. शरद पवार यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं आणि तुम्ही आमच्यावर टीका करताय.”

तुम्ही तुमचं काम करा, आम्ही आमचं काम करतो

छगन भुजबळ म्हणाले की, जितेंद्र आव्हाड यांच्या तोंडातून संताप बाहेर पडत आहे. ते जेवढे संताप व्यक्त करतील तेवढी अपली शक्ती वाढणार आहे. आता आम्हाला तुम्ही विसरा, नवीन काम सुरू करा. तुम्ही तुमचं काम करा, आम्ही आमचं काम करत आहोत. एखाद्या विशिष्ट परिस्थितीमुळे आम्ही इथं आलो. तुम्ही ती परिस्थित उभी केली. प्रत्येक वेळा तुम्ही तळ्यात मळ्यात राहिला. आम्ही ठरवलं एकदाचं काय ते, तळ्यात नाहीतर मळ्यात जाऊ आणि आम्ही मळ्यात आलो.

उरला सुरला पक्ष संपवायला इतरांची गरज नाही

छगन भुजबळ म्हणाले की, “आम्ही ग्रामपंचायत निवडणुकीत दोन नंबरला आलो. आता तुम्ही सांगा बरं कितव्या नंबरला आहात? आता उरले सुरले देखील आमच्याकडे येतील. उरला सुरला पक्ष संपवायला बाकी लोकांची गरज नाही, हेच लोक पक्ष संपवून टाकतील.”

निवडणूक आयोगात केस सुरू आहे. निर्णय आपल्याच बाजूने लागेल, कारण आपण सर्व पुरावे दिले आहेत. आपला पक्ष नवीन नाही. आपलं ध्येय तेच आहे. ‘रात नहीं, ख्वाब बदलता हैं, मंजील वही हैं कारवां बदलता हैं, जजबात रखो जितने का… क्योंकी किस्मत बदले ना बदले, वक्त जरूर बदलता है’.

मराठा आरक्षणावर सर्वांची जी भूमिका तीच आपली भूमिका 

शाहू, फुले, आंबेडकर यांचाच विचार आपला आहे. सगळ्यांना बरोबर घेऊन आपल्याला काम करायचं आहे. मराठा आरक्षण अनुषंगाने मी जे बोलत आहे तेच सगळे बोलत आहोत. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात आरक्षण दिलं होतं, आता कोर्टात याबाबत चर्चा सुरु आहे. दलित ओबीसी, आदिवासी यांच्या अधिकाराला धक्का न लावता आरक्षण दिलं जाईल. मी जो विषय मांडतो तो आज नाही मांडत, आधीपासून हे बोलत आहे. ओबीसीच्या मुद्द्यावर तर मी शिवसेनेतून काँगेसमध्ये शरद पवार यांच्यासोबत आलो. बाकी लोक काही बोलतील आपल्याला, आपलं काम करायचं आहे. 

ही बातमी वाचा: 

[ad_2]

Related posts