Ambadas Danve Will Join Ruling Party Big Statement BJP MLA Haribhau Bagde Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह 16 आममदारांबाबत अपात्र की पात्र याबाबतचा निकाल येण्यासाठी अवघ्या काही तासांचा वेळ शिल्लक आहे. असे असतानाच भाजपचे आमदार तथा माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे (Haribhau Bagde) यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे. “विरोधी पक्षनेत्याने सत्ताधाऱ्यांसोबत जाण्याची परंपरा आहे, त्यामुळे काहीतरी शिजतंय” असे वक्तव्य बागडे यांनी केले आहे. त्यांच्या याच वक्तव्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) सत्ताधारी पक्षात सहभागी होणार का?, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) माध्यमांशी बोलतांना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. 

सोमवारी छत्रपती संभाजीनगर जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. यावेळी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे देखील बैठकीत उपस्थित होते. मात्र, सत्ताधाऱ्यांविरोधात नेहमी आक्रमक भूमिका घेणाऱ्या दानवेंनी या बैठकीत नरमाईची भूमिका घेतल्याची चर्चा आहे. यावरूनच भाजप आमदार हरिभाऊ बागडे यांनी अंबादास दानवे यांना जोरदार टोला लगावला. “दानवेंचा बैठकीतील नूर हा प्रेमाचा होता व सत्ताधाऱ्यांच्या बाजूने होता. विरोधी पक्षनेत्याने सत्ताधाऱ्यांसोबत जाण्याची परंपरा आहे, त्यामुळे काहीतरी शिजतंय,” असे बागडे म्हणाले. 

दानवेंचा बागडे यांच्यावर हल्लाबोल 

याच बैठकीत दानवे यांनी देखील बागडे यांना टोला लगावल्याचे पाहायला मिळाले आहेत. बैठकीत सत्ताधारी बागडे यांच्यासारख्या ज्येष्ठ लोकप्रतिनिधीचे चार-चार वर्षे काम होत नसल्याची टीका दानवे यांनी केली. बागडे ज्येष्ठ सदस्य आहेत. त्यांची कामे वर्षानुवर्षे होत नसतील तर बाकीच्यांचे काय? असेही दानवे म्हणाले. दानवे यांच्या याच टोलेबाजीनंतर बागडे यांनी बैठक संपल्यावर माध्यमांशी बोलतांना दानवेंच्या नरमाईची भूमिकेचा ‘बॉम्ब’ टाकला. 

पहिल्यांदा एवढा मोठा पोलीस बंदोबस्त…

मागच्या जिल्हा नियोजन बैठकीत अंबादास दानवे आणि संदिपान भुमरे यांच्यात जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. तर, दानवे हे भुमरे यांच्या अंगावर धावून गेले होते. त्यामुळे कालच्या बैठकीत पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आतापर्यंतच्या जिल्हा नियोजन बैठकीत पहिल्यांदाच एवढा पोलीस बंदोबस्त पाहायला मिळत असल्याचे अनेक लोकप्रतिनिधी म्हणाले. विशेष म्हणजे बैठकी संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांची पोलिसांना यादी देण्यात आली होती. यादीत नावं असलेल्या लोकांनाच आतमध्ये सोडण्यात येत होते. त्यामुळे कालची जिल्हा नियोजन समिती अनेक कारणांनी चर्चेत आली. 

व्हिडिओ: दानवे प्रेमाच्या सुरात होते, काही शिजतंय का? हरिभाऊ बागडेंचं सूचक वक्तव्य

इतर महत्वाच्या बातम्या: 

जमीन गैरव्यवहारावरून संभाजीनगर जिल्हा नियोजन समितीची बैठक गाजली; दानवे, जलील, बागडे आक्रमक

[ad_2]

Related posts