Flipkart Announced The Republic Day Sale After Amazon Here Is The List Of Few Best Deals

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Flipkart Sale :  दरवर्षी जानेवारी महिना येताच लोक Republic Day Saleची वाट पाहू लागतात. यानिमित्ताने भारतातील अनेक ई-कॉमर्स कंपन्या ऑनलाइन  सेल सुरु करतात. ज्यामध्ये स्मार्टफोनसह सर्व प्रकारच्या प्रॉडक्टवर आणि सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर सूट दिली जाते. या सेलची सगळेच वाट बघतात आणि लाखो लोक या सेलमधून अनेक वस्तू खरेदी करत असतात. या काही दिवसांच्या सेलमध्ये लाखो रुपयांची खरेदी भारतीय करत असतात. 

अॅमेझॉनपाठोपाठ फ्लिपकार्टने केली सेलची घोषणा

अॅमेझॉनने Republic Day Sale ची घोषणा केली आणि आता फ्लिपकार्टनेही सेलची घोषणा केली आहे. फ्लिपकार्टचा Republic Day Sale 14 जानेवारीपासून सुरू होणार असून तो 19 जानेवारीपर्यंत चालणार आहे. फ्लिपकार्टच्या प्लस मेंबरशिप युजर्ससाठी हा सेल 24 तास आधी म्हणजेच 13 जानेवारीपासून सुरू होणार आहे. अॅमेझॉननेही 14 जानेवारीपासूनRepublic Day Sale ची घोषणा केली असून प्राइम युजर्ससाठी सेल 24 तास आधी म्हणजेच 13 जानेवारीपासून सुरू होणार आहे. 

मात्र, फ्लिपकार्ट सेलबद्दल बोलायचे झाले तर कंपनीने यावेळी युजर्सना फायदा व्हावा यासाठी आयसीआयसीआय बँकेसोबत पार्टनरशिप केली आहे. म्हणजेच जर तुम्ही या बँकेच्या कार्डने पेमेंट केले तर तुम्हाला प्रत्येक प्रॉडक्टवर 10% इन्स्टंट डिस्काउंट दिला जाईल. याशिवाय या सेलमध्ये युजर्सना नो कॉस्ट ईएमआय आणि अनेक प्रॉडक्ट्सच्या किंमतीदेखील कमी होणार आहे. 

या फोनवर डिस्काउंट मिळण्याची शक्यता

कंपनीने अजून फोनवरील डिस्काउंट ऑफरबाबत नेमकी माहिती दिलेली नसली तरी या सेलमध्ये काही स्मार्टफोन्सवर मोठी सूट मिळू शकते. या स्मार्टफोनमध्ये आयफोन सहPixel 7a, Samsung Galaxy S21 FE 5G, Motorola Edge 40 Neo, Samsung Galaxy S22 5G, Pixel 8, Vivo T2 Pro, Oppo Reno 10 Pro, Vivo T2x, Poco X5, Realme 11, Redmi 12, Samsung Galaxy F34 5G, आणि इतर अनेक फोनचा समावेश आहे.

आयफोनवरही डिस्काउंट

जर तुम्हाला या सेलमध्ये आयफोन खरेदी करायचा असेल तर कंपनी आयफोन 15, आयफोन 14, आयफोन 13, आयफोन 12 सीरिजच्या वेगवेगळ्या मॉडेल्सवर जोरदार डिस्काउंट देखील देऊ शकते. आयफोन 15 चे बेस मॉडेल 128 जीबी स्टोरेज आहे, जे 79,900 रुपयांमध्ये लाँच करण्यात आले होते, परंतु हा आयफोन सध्या फ्लिपकार्टवर 72,999 रुपयांमध्ये लिस्ट झाला आहे. म्हणजेच सेल पूर्वीच आयफोन 15 वर 6,901 रुपयांची सूट दिली जात आहे. सेलमध्ये 4-5 रुपयांची अतिरिक्त सूट दिल्यास आणि कार्ड ऑफर्सच्या मदतीने युजर्सला आयफोन 15 60-65 रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी मिळू शकते.

इतर महत्वाची बातमी-

CES 2024 : लॉंच झाला आहे Android आणि Windows दोन्हींवर चालणारा लॅपटॉप, जाणून घ्या नेमकं कसं करतो काम?

[ad_2]

Related posts