PM Narendra Modi Visit Maharashtra Mumbai Road Clean Maharashtra Politics ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


PM Narendra Modi Nashik : पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात, मोदींच्या स्वागतासाठी मुंबईचे रस्ते चमकले
PM Narendra Modi Nashik Visit नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर होते. सकाळी 10.30 वाजता त्याचे निलगिरी बाग येथे आगमन झाले. त्यानंतर नाशिकमध्ये मोदींचा भव्य रोड शो झाला. यावेळी हजारो नाशिककरांनी त्यांच्यावर फुलांची उधळण केली. जय श्रीराम च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. रोड शो नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकच्या रामकुंड परिसराला त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्या हस्ते जलपूजन आणि गोदावरीची आरती करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुरोहित संघाच्या वतीने चांदीचा कुंभ आणि पगडी देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी भारत विकसित राष्ट्र बनण्यासाठी संकल्प करण्यात आला. रामकुंड परिसराला भेट देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे  काळाराम मंदिरात दर्शनासाठी दाखल झाले. 

[ad_2]

Related posts