Rajyog 2024 : ‘या’ राशीत तयार होणार ‘महाभाग्य योग’! माता लक्ष्मीच्या कृपेने बरसणार पैशांचा पाऊस

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Mahabhagya Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रात कुंडली आणि ग्रह स्थिती याला अतिशय महत्त्व आहे. एखादी व्यक्ती सामान्य कुटुंबात जन्माला येते पण ती यशाच्या शिखरावर पोहोचलेली आपण आपल्या आजूबाजूला पाहतो. अशावेळी ज्योतिषशास्त्र अभ्यास म्हणतात की त्याची ग्रह स्थितीत धनवान होणं लिहिलं असतं. कौटुंबिक पार्श्वभूमी खूपच कमकुवत असून त्या घरातील एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत अनेक राजयोग निर्माण होतात. त्यामुळे याला या राजयोगामुळे श्रीमंत होण्याचा मार्ग गवसतो. 

वैदिक ज्योतिषशास्त्रात शश, रुचक, मालव्य, भद्रा, बुधादित्य, गजकेसरी, गजलक्ष्मी आणि महाभाग्य राजयोग हे सर्वात शुभ आणि भाग्यशाली मानले गेले आहेत. ज्यामध्ये महाभाग्य राजयोग ज्या व्यक्तीच्या कुंडलीत तयार होतो तो सामान्य कुटुंबात जन्म घेऊनही श्रीमंत होतो. (Mahabhagya Rajyog will be formed in this zodiac sign Money will rain with the grace of Mata Lakshmi)

मेष रास (Aries Zodiac) 

तुमच्या आत्मविश्वास वाढणार आहे. आईकडून आर्थिक फायदा होणार आहे. वैवाहिक जीवनात सुखात वाढ होणार आहे. मित्राच्या मदतीने तुम्हाला नोकरीच्या संधी मिळणार आहे. उत्पन्नात वाढ होणार आहे. कुटुंबात मान-सन्मान वाढणार आहे. नोकरीत बढतीची शक्यता निर्माण झाली आहे. 

मिथुन रास (Gemini Zodiac)

कुटुंबात धार्मिक कार्ये होणार आहे. मुलांच्या आनंदात वाढ होणार आहे. उच्च शिक्षण आणि संशोधन इत्यादींसाठी परदेशात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कामाच्या ठिकाणी बदल घडणार आहे. मनात शांती आणि आनंदाची भावना असणार आहे. आत्मविश्वासाने परिपूर्ण तुम्ही असणार आहात. आई किंवा कुटुंबातील वृद्ध महिलेकडून आर्थिक फायदा होणार आहे. 

सिंह (Leo Zodiac) 

तुमच्या आनंदात भर पडणार आहे. तुम्हाला पालकांचे सहकार्य लाभणार आहे. अभ्यासात रुची वाढणार आहे. शैक्षणिक कार्यात आनंददायी परिणाम मिळणार आहे. नोकरीत प्रगती होणार असून घरामध्ये धार्मिक कार्यक्रम होणार आहे. धार्मिक प्रवासाचे योग जुळून आले आहेत. 

कन्या रास (Virgo Zodiac)   

कन्या राशीच्या लोकांची आर्थिक बाजू मजबूत होणार आहे. गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होणार आहे. देवी लक्ष्मीच्या कृपेने आर्थिक लाभ होणार आहे. व्यापारी वर्गासाठी हा काळ वरदानापेक्षा कमी नसरणार आहे. 

धनु रास (Sagittarius Zodiac) 

मनात शांती आणि आनंदाची भावना असणार आहे. तुम्हाला संशोधन वगैरेसाठी दुसऱ्या ठिकाणी प्रवास करावा लागणार आहे. नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य तुम्हाला लाभणार आहे. प्रगतीचा मार्ग मोकळा होणार आहे. उत्पन्नात वाढ होणार आहे. मित्रांकडून सहकार्य मिळणार आहे. 

 

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Related posts