cricket india vs afghanistan shubman gill out of 2nd t20 match rohit sharm run out

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Ind vs AFG T20 : टी20 विश्वचकाची तयारी करणारी टीम इंडिया अफगाणिस्तानविरुद्ध टी20 मालिका खेळत आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतली पहिल्या टी20 सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा 6 विकेटने पराभव केला. या मालिकेतून बीसीसीआय (BCCI) टी20 विश्वचशकासाठी (T20 World Cup) खेळाडूंची चाचपणी देखील करत आहे. त्यामुळे प्रत्येक खेळाडू आपलं शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करतोय. असं असताना पहिल्या सामन्यात अनुभवी युवा फलंदाज शुभमन गिलकडून (Shubman Gill) एक मोठी चूक झाली. या चुकीचा फटका टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) सहन करावा लागला.

शुभमन गिलची चूक महागात पडणार?
भारत-अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यातून शुभमन गिलची सुट्टी होण्याची शक्यता आहे. येत्या चौदा तारखेला दुसरा सामना इंदौरला खेळवला जाणार आहे. या सामन्यात प्लेईंग इलेव्हनमध्ये गिलला संधी मिळणार नाही अशी चर्चा आहे. याचं कारण ठरलंय गिलची पहिल्या टी20 सामन्यातील घोडचूक. 

रोहितचं पुनरागमन फसलं
टी20 सामन्याच्या पहिल्या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर शुभमन गिलकडून मोठी चूक झाली. या चुकीचा फटका रोहित शर्माला बसला. रोहित शर्माने पुढे येत मिड ऑफवर फटका लगावला आणि तो धाव घेण्यासाठी धावत सुटला. पण अफगाणिस्तानच्या फिल्डरने उडी मारत चेंडू अडवला. रोहित धाव घेण्यासाठी दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचला.  शुभमन गिलचं त्याच्याकडे लक्षच नव्हतं तो चेंडू पाहात दोन पावलं पुढे गेला आणि पुन्हा क्रिजमध्ये आला. फिल्डरने विकेटकिपरकडे चेंडू फेकला आणि रोहित शर्मा रनआऊट झाला. यानंतर रोहित शर्माचं स्वत: वरचं नियंत्रण सुटलं. भर मैदानात त्याने शुभमन गिलला चांगलंच फटकारलं. 

दुसऱ्या टी20 सामन्यातून सुट्टी?
पण हे खऱं कारण नाहीए. टीम इंडियाच्या कॉम्बिनेशनमध्ये शुभमन गिल फिट बसत नाहीए. पहिल्या साम्यात यशस्वी जयस्वाल दुखापतग्रस्त होता, त्यामुळे शुभमन गिलला संधी देण्यात आली होती. पण आता यशस्वी जयस्वाल दुखापतीतून सावरला असून दुसऱ्या सामन्यात तो रोहित शर्माबरोबर भारतीय डावाची सुरुवात करेल. तर विराट कोहलीसुद्धा दुसऱ्या सामन्यात खेळणार असून त्याची तिसऱ्या क्रमांकावर जागा निश्चित आहे. 

चौथ्या क्रमांकावर शिवम दुबेने आपला जागा पक्की केली आहे. पहिल्या सामन्यात 60 धावांची खेळी करत शिवमने भारताला शानदार विजय मिळवून दिला, तर पाचव्या क्रमांकावर आक्रमक फलंदाज रिंकू सिंग आहे. त्यामुळे शुभमन गिलला प्लेईंग-11 मध्ये जागाच नाहीए. शिवाय गेल्या काळात त्याचा फॉर्मही चिंतेचा विषय बनलाय. 

टी20 क्रिकेटमध्ये खऱाब कामगिरी
एकदिवसीय क्रिकेटमध्ये 60 च्या अॅव्हरेजने धावा करणारा शुभमन गिल टी20 क्रिकेटमध्ये सपशेल अपयशी ठरतोय. शुभमन गिल आतापर्यंत 14 टी20 सामने खेळलाय. पण यात त्याने केवळ 335 धावा केल्या आहेत. यात त्याने एक शतक केलं आहे. म्हणजे इतर सामन्यात तो समाधानकारक कामगिरी करु शकलेला नाही. टी20 क्रिकेटमध्ये शुभमन गिलचा अॅव्हरेज फक्त 25.77 इतका कमी आहे. 

Related posts