Shiv Sena UBT Leader Uddhav Thackeray Kalyan Tour Slam CM Eknath Shinde And MP Shrikant Shinde Maharashtra Politics

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Uddhav Thackeray Today Kalyan Visit : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कल्याणच्या दौऱ्यावर आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde)  आणि श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde)  यांच्या बालेकिल्ल्यामध्ये उद्धव ठाकरेंचा (uddhav thackeray kalyan visit) झंझावती दौरा होणार आहे. त्यामुळे ठाकरेंच्या दौऱ्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. डोंबिवली येथे येथे उद्धव ठाकरे यांचं जोरदार स्वागत करण्यात आले. त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला. गद्दारांना गाडा, येत्या निवडणुकीत कचऱ्याच्या डब्ब्यात टाका, असेही ठाकरे म्हणाले. 

कल्याण मतदारसंघाची मोठी जबाबदारी आहे. गद्दार घराणेशीहीच्या मुळावर घाव घालायचा आहे. लोकसभा निवडणुकीत हुकूमशाहीवर संक्रात येणार आहे. गद्दारांच्या घराणेशीहीचं तिकिट मोदीच कापतील, असे ठाकरे म्हणाले. 

एकनाथ शिंदेंना टोला – 

पंतप्रधान नरेंद्र मोदी काल (शुक्रवारी) येऊन गेले. उद्या संक्रात आहे. तिळगुळ घ्या गोड गोड बोला. एक साधा शिवसैनिक काय करू शकतो हे आपण करून दाखवलाय. गद्दारांच्या घराणेशाहीचं तिकीट मोदीच कापतील, असा टोला यावेळी ठाकरेंनी लगावला. ह्या माझ्या नुसत्या भेटी आहेत.  शाखा जुन्याच आहेत, पण नवं प्राणप्रतिष्ठा आपण करत आहोत. गद्दारांना कचराच्या पेटीत आपण टाकणार आहोत, असी ठाकरे म्हणाले. 

भाजपला इशारा – 

शिवसैनिकांना डिवचू नका हे भाजपला सांगतो. शिवसैनिक म्हणजे मधमशाचं पोळ आहे. आतापर्यत तुम्ही मध घेतलं आतां या पोळाला दगड मारू नका. 
आता मी एवढाच सांगतो गद्दारना गाडून टाका, असे ठाकरे म्हणाले. 

संजय राऊत काय म्हणाले ?

कोणी कुठे गेले? कोणी बिळात गेले? पण जे आज उद्धव ठाकरेंच्या स्वागतला आले ते खरे शिवसैनिक आहेत. हा कल्याण मतदारसंघ कोणाची जहागीर नाही, येथे फक्त आपला भगवा शुद्ध झेंडा फडकणार आहे. न्याय सुद्धा आज विकत घेतला जातोय. जेंव्हा बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा हे गोधडीत सुद्धा नव्हते आणि हे म्हणातात आम्ही बाळासाहेबांची शिवसेना आहे. बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेली आपली शिवसेना आहे, असे संजय राऊत यांनी सांगितलं. 

कसा असेल दौरा – 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये आज शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दौरा आहे. अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, कल्याण ग्रामीण, कळवा मुंब्रा या ठिकाणी उद्धव ठाकरे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या भेटी घेणार आहेत. दुपारी 12 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत हा दौरा असेल. उद्धव ठाकरे यांचा कल्याण लोकसभा मतदारसंघातला दौरा. दौऱ्याची सुरुवात अंबरनाथ पासून होईल. कल्याण डोंबिवली आणि मुंब्रा इथल्या शाखांना भेट देऊन शेवट कळवा येथील शाखेजवळ करण्यात येईल.

आणखी वाचा :

उद्धव ठाकरे कल्याण दौऱ्यावर, शिंदे पिता-पुत्रांच्या बालेकिल्ल्यात तोफ धडाडणार!

[ad_2]

Related posts